राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत रिद्धी, सिद्धीने जिंकले रौप्यपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 01:23 AM2017-11-23T01:23:46+5:302017-11-23T01:24:11+5:30
कोलकाता येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत औरंगाबादच्या रिद्धी व सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी जबरदस्त कामगिरी करताना रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना या दोघींनी मुलींच्या १७ वर्षांखालील सांघिक गटात ही पदकविजेती कामगिरी केली.
औरंगाबाद : कोलकाता येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत औरंगाबादच्या रिद्धी व सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी जबरदस्त कामगिरी करताना रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना या दोघींनी मुलींच्या १७ वर्षांखालील सांघिक गटात ही पदकविजेती कामगिरी केली.
याआधी गतवर्षी रिद्धीने १४ वर्षांखालील गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना सांघिक सुवर्णपदक जिंकले होते, तसेच या वर्षीदेखील तिने रौप्यपदक जिंकले. या जबरदस्त कामगिरीमुळे नव्यानेच सुरू झालेल्या ‘खेलो इंडिया’च्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी या दोघींची महाराष्ट्राच्या संघातील निवड निश्चित झाली आहे. या स्पर्धा डिसेंबर महिन्यात दिल्ली येथे होणार आहेत.
रिद्धी व सिद्धी हत्तेकर या शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या आठवीतील विद्यार्थिनी असून, त्यांना प्रशिक्षक रामकृष्ण लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल ‘साई’ केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, अजितसिंह राठोड, जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या प्रशिक्षक तनुजा गाढवे, आंतरराष्ट्रीय पंच मकरंद जोशी, जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. संकर्षण जोशी, सचिव सागर कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुरेखा देव, उपमुख्याध्यापिका उज्ज्वला निकाळजे यांनी रिद्धी व सिद्धी हत्तेकर यांचे अभिनंदन केले आहे.