भरधाव कार-बसची धडक

By Admin | Published: May 31, 2016 12:09 AM2016-05-31T00:09:47+5:302016-05-31T00:42:04+5:30

पाचोड : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोडजवळ एका ढाब्यासमोर रविवारी (दि.२९) मध्यरात्री एस.टी. महामंडळाची बस व कार यांच्यात झालेल्या अपघातात २५ जण जखमी झाले.

Riding a car-bus | भरधाव कार-बसची धडक

भरधाव कार-बसची धडक

googlenewsNext


पाचोड : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोडजवळ एका ढाब्यासमोर रविवारी (दि.२९) मध्यरात्री एस.टी. महामंडळाची बस व कार यांच्यात झालेल्या अपघातात २५ जण जखमी झाले.
लातूर डेपोची औरंगाबाद ते लातूर ही बस (क्र. एमएच २० बीएल २२१७) ही गाडी रविवारी रात्री औरंगाबादहून लातूरकडे चालली होती. बीडहून कार ( क्र. एमएच २0 सीएस ६0५३) औरंगाबादकडे जात असताना बस व कार यांचा समोरासमोर जोरदार अपघात झाला. त्यात बसमधील विश्वास संपत सोपाथी (४0, रा. औरंगाबाद), संजय शिवलाल मरिहंगर (६0, रा. लातूर), कालिका व्यंकटराव (६५, रा. औरंगाबाद), सुनील रामसिंग (४५, रा. दोंदडगाव), फारुकी फैजल (२५, रा. बीड), हनुमंत बाबुराव (५५, रा. गंगापूर), रमाकांत साहेबराव (५५, रा. अंबाजोगाई), शेख सलीम (३२, रा. बीड), सय्यद मिशाद (२६, रा. बीड), श्रीकांत धनशाम इंदानी (४३, रा. वडीगोद्री), अश्विनी सिरसाठ (२३, रा. पाटोदा), अशोक सिरसाठ (२६, रा. पाटोदा), शोभा निदेश गवई (४२, नवसाळी), दिनेश सोपान गवई (५0 रा. नवसाळी), शारदा श्रीराम सुवसे (३0, रा. शेवता), श्रीराम शिवाजी (३४, रा. शेवता), संतोष जगताप (३५,रा. पाचोड), सुनीता लक्ष्मण (३0, रा. दावरवाडी) जखमी झाले.
अपघाताचा आवाज होताच आजूबाजूला ढाब्यावर असलेल्या नागरिकांनी तिकडे धाव घेतली. पाचोड पोलिसांना माहिती दिली. अपघातामुळे काही वेळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पाचोडचे सपोनि महेश आंधळे यांनी अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करून दिली. यानंतर जखमींना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविले. यावेळी डॉ. प्रवीण बोडेवार, डॉ. साकीब सौदागर, अधिपरिचारिका दीपा साळवे, श्रीलंका पवार यांनी उपचार केले. बसमधील जखमी प्रवासी श्रीकांत इंदाणी (रा. बदनापूर) म्हणाले की, अपघात समोरासमोर झाला. यात ३0 ते ३५ जण जखमी झाले. काही जखमी प्रवासी तात्काळ खासगी रुग्णालयात निघून गेल्यामुळे त्यांची नावे समजू शकली नाहीत.

Web Title: Riding a car-bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.