मोसंबीची आवक वाढली, दर स्थिर
By Admin | Published: February 15, 2015 12:46 AM2015-02-15T00:46:10+5:302015-02-15T00:46:10+5:30
संजय कुलकर्णी , जालना गेल्या सप्ताहापेक्षा चालू सप्ताहात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोसंबीची आवक वाढली आहे. शुक्रवारी १५८२ क्विंटल मोसंबीची आवक झाली.
संजय कुलकर्णी , जालना
गेल्या सप्ताहापेक्षा चालू सप्ताहात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोसंबीची आवक वाढली आहे. शुक्रवारी १५८२ क्विंटल मोसंबीची आवक झाली.
मोसंबीचा जिल्हा अशी ओळख असलेल्या या जिल्ह्यात शेतकरी मोसंबीचा माल मोठ्या प्रमाणात येथील बाजार समितीमध्ये घेऊन येतात. येथून अहमदाबाद, जयपूर, आग्रा या भागात मोठ्या प्रमाणात मोसंबीची मागणी होते.
सध्या मोसंबीचे दर ६००० ते १४००० रुपयांपर्यंत आहेत. सरासरी ८५०० रुपयांनी मोसंबीची खरेदी केली जाते.
कापसाची वाहने बाजार समितीच्या आवारात रांगा लावून उभी आहेत. शनिवारी मात्र कापूस खरेदी बंद होती. या आठवड्यात सीसीआयच्या कापसाची खरेदी ५ लाख ५ हजार क्विंटलपर्यंत गेली आहे. यंदा कमी पावसामुळे तुरीचे दर तेजीतच आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत तुरीची आवक त्यामुळे कमी झाली आहे. शनिवारी ११४१ क्विंटल तुरीची आवक झाली. गहू १०७५ ते १६५० रुपये प्रतिक्विंटल, ज्वारी ११०० ते १९२५, बाजरी १०२५ ते १२००, मका १०९० ते १२०८, हरभरा ३३५० ते ३६३०, सोयाबीन २८५० ते ३३००, गुळ २०२५ ते २३५० रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे दर होते. गुळाची आवक कायम असून मका, सोयाबीन, हरभरा यांची आवक घटली आहे.