ग्रामीण भागातील बाधितांचा वाढता मृत्यूदर चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 20:05 IST2020-09-14T20:03:26+5:302020-09-14T20:05:14+5:30
मृत्यूदरांत खुलताबाद आघाडीवर आहे. तर सर्वाधिक ५२ मृत्यूची गंगापूर तालुक्यात नोंद आहे.

ग्रामीण भागातील बाधितांचा वाढता मृत्यूदर चिंताजनक
औरंगाबाद : गेल्या पाच दिवसांत ग्रामीण भागात १ हजार ४० रुग्ण वाढले, तर २५ बाधितांचा मृत्यू झाल्याने मृत्यूदर २ टक्क्यांवर पोहोचला. मात्र, कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ८०.४१ झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातील बाधितांची संख्या १० हजार ३०२ झाली असून, ८२८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. २०३ जणांचा मृत्यू झाला असून १८१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
ग्रामीण भागात ७ ते १२ सप्टेंबरदरम्यान १०४० रुग्ण वाढले. ५ दिवसांत २५ मृत्यू झाल्याने हे प्रमाण १.९० वरून २ टक्क्यांवर पोहोचले, तर या पाच दिवसांत ६४० रुग्णांना सुटी मिळाली. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ८०.४१ टक्क्यांवर पोहोचले असून, १७.६१ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अनुक्रमे फुलंब्री, सोयगाव, खुलताबाद येथे सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या कमी आहे, मृत्यूदरांत खुलताबाद आघाडीवर आहे. तर सर्वाधिक ५२ मृत्यूची गंगापूर तालुक्यात नोंद आहे.
तालुकानिहाय कोरोनाची स्थिती
तालुका एकूण बाधित कोरोनामुक्त मृत्यू संख्या उपचार सुरू रुग्ण
औरंगाबाद ३१०३ २५९१ ३० ४८२
गंगापूर २४६८ २०३४ ५२ ३८२
वैजापूर १२४३ ९६१ १७ २६५
पैठण ११८२ ८२५ २४ ३३३
सिल्लोड ८१३ ६४० ३१ १४२
कन्नड ७४१ ६०४ २५ ११२
फुलंब्री ३४० २८३ ११ ४६
सोयगाव २२६ १९५ ५ २६
खुलताबाद १८६ १५१ ८ २७
(तक्ता १२ सप्टेंबर जि. प. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार)