...अखेर बिडकीन येथ फूडपार्कचा मार्गचा खुला
By | Published: December 6, 2020 04:00 AM2020-12-06T04:00:02+5:302020-12-06T04:00:02+5:30
परवा ऑरिक अर्थात ‘एआयटीएल’ संचालक मंडळाच्या बैठकीत फूडपार्कचा विषय चर्चेला आला. त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. बिडकीन इंडस्ट्रीयल पार्कमध्ये ...
परवा ऑरिक अर्थात ‘एआयटीएल’ संचालक मंडळाच्या बैठकीत फूडपार्कचा विषय चर्चेला आला. त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. बिडकीन इंडस्ट्रीयल पार्कमध्ये आता सर्व पायाभूत सुविधा तयार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर फूडपार्कचा प्रकल्प अहवाल तयार करुन देश-विदेशातील अन्नप्रक्रियेशी संबंधित उद्योगांना संपर्क साधून गुंतवणुकीसाठी निमंत्रित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
फूडपार्कमध्ये बेकरी, बिस्कीट, डाळींचे विभाजन आणि प्रक्रिया उद्योग, फळप्रक्रिया उद्योग, तेल उद्योग आदी अन्नप्रक्रियेशी संबंधित उद्योगांना सवलतीच्या दरात बिडकीन इंडस्ट्रीयल पार्कमध्ये गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले जाणार आहे. याठिकाणी उद्योगांना अत्यावश्यक असणारी गोदामे, शीतगृहेही उभारली जाणार आहेत. भविष्यात या उद्योगांसाठी पाईपलाईनद्वारे गॅस पुरविण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्याचा ‘एआयटीएल’चा मानस आहे.
चौकट..............................
तीन आठवड्यांत तयार करणार प्रकल्प अहवाल
यासंदर्भात ‘ऑरिक’चे सहव्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी सांगितले की, ‘एआयटीएल’च्या बैठकीत परवा फूडपार्कला मंजुरी मिळाली. त्यानुसार आम्ही तीन आठवड्यांत यासंबंधीचा प्रकल्प अहवाल तयार करणार आहोत. याठिकाणी पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. परंतु, उद्योगांच्या दृष्टीने सोयीचे ठरणार आहे. यापुढे रस्ते, वीज, पाणी, वेस्ट वॉटर प्रोसेसिंग युनिट यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. देश-विदेशातील संबंधित उद्योगांकडे यासंबंधीची मार्केटिंगही केले जाईल.