वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रस्त्यावरील वाहनांना लागणार ‘जॅमर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 10:51 PM2019-08-25T22:51:51+5:302019-08-25T22:51:58+5:30

वाहतुकीला अडथळा ठरणाºया रस्त्यावरील वाहनांना आता जॅमर लावण्यात येणार आहे.

 Road jammers will need 'jammers' for obstructing traffic | वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रस्त्यावरील वाहनांना लागणार ‘जॅमर’

वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रस्त्यावरील वाहनांना लागणार ‘जॅमर’

googlenewsNext

वाळूज महानगर : वाहतुकीला अडथळा ठरणाºया रस्त्यावरील वाहनांना आता जॅमर लावण्यात येणार आहे. अनेकवेळा तंबी देवूनही वाहनचालकांत सुधारणा होत नसल्याने वाहतूक पोलिसांनी ही भूमिका घेतली आहे.


वाळूज महानगरात मुख्य व अंतर्गत रस्त्यावर सर्रासपणे वाहने उभी केली जातात. औद्योगिक तसेच नागरी वसाहतीत मुख्य रस्त्यावर वाहने उभी रहात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होते. यामुळे वाहनधारकांना वाहने चालविणे अवघड जात असल्याने अपघातातच्या घटना घडत आहेत.

वाढत्या अपघाताच्या घटना थांबविण्यासाठी नुकतीच पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी महानगरातील अपघातग्रस्त ब्लॅक स्पॉटची पाहणी करुन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

वाळूज वाहतूक शाखेचे निरीक्षक शेषराव उदार यांनी राज्य महामार्ग तसेच वाळूज एमआयडीसी मधील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर वाहने पार्क करणाºयांवर करवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहने उभी करणाºया वाहनधारकांनी आता काळजी घेणे आवश्यक आहे.

Web Title:  Road jammers will need 'jammers' for obstructing traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.