बारभाई वस्तीवर लोकसहभागातून रस्ता दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:02 AM2021-07-29T04:02:26+5:302021-07-29T04:02:26+5:30
केऱ्हाळा येथील डोंगराशेजारील बारभाई वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून रस्त्याची अडचण होती. अनेकवेळा विविध स्तरावर निवेदने देऊन पाठपुरावा ...
केऱ्हाळा येथील डोंगराशेजारील बारभाई वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून रस्त्याची अडचण होती. अनेकवेळा विविध स्तरावर निवेदने देऊन पाठपुरावा केला. मात्र, याकडे कोणीच लक्ष दिले नाही. तीन महिन्यांपूर्वी येथील नागरिकांनी पंचायत समिती सदस्या कविता बांबर्डे यांची भेट घेत घेऊन समस्या सांगितली. त्यांनी पंचायत समितीचा निधी मंजूर करून घेतला. मात्र, तो तोकडा होता. यात तीन किलोमीटर रस्ता पूर्ण होणे शक्य नव्हते. तेव्हा नागरिकांनी श्रमदान करून हा रस्ता तडीस नेण्याचे ठरविले. यासाठी प्रत्येक कुटुंबाने परिश्रम घेतले. यानंतर हा रस्ता दुरुस्त झाला आहे. यावेळी साहेबराव बांबर्डे, सूर्यभान बन्सोड, अजिनाथ भिंगारे, संजय राजपूत, भिमसिंग चुंगडे, रामसिंग बारवाळ, सुधाकर पांढरे, गांधीसिंग बारवाळ, ऊदलसिंग चुंगडे, रामप्रसाद चुंगडे, विष्णू पांढरे, भगवान पांढरे, रामधन चुंगडे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
कोट--
या परिसरातील नागरिकांनी रस्ता दुरुस्तीसाठी नोंदविलेला सहभाग व त्यांनी केलेली प्रचंड मेहनत यात त्यांचा विकासात्मक दृष्टिकोन समोर येतो. इतर शेतवस्तीवरील नागरिकांनीही लोकसहभातून रस्ता दुरुस्तीसाठी पुढे यावे.
-कविता बांबर्डे, पंचायत समिती सदस्या