वेरूळमध्ये रस्ता सुरक्षा अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:05 AM2021-01-21T04:05:51+5:302021-01-21T04:05:51+5:30

महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने ते कमी करण्याच्या दृष्टीने नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने वाहन चालवत ...

Road safety campaign in Eluru | वेरूळमध्ये रस्ता सुरक्षा अभियान

वेरूळमध्ये रस्ता सुरक्षा अभियान

googlenewsNext

महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने ते कमी करण्याच्या दृष्टीने नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने वाहन चालवत असताना नियमांचे पालन काटेकोर करणे, वाहन चालविताना सीट बेल्ट लावणे, दुचाकीवर हेल्मेटचा वापर करणे, वाहन चालविताना वेग मर्यादा असावी, रात्री रस्त्याच्या कडेला वाहन पार्क करू नये, आदीबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी खुलताबादचे पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले, पोलीस उपनिरीक्षक रामदास वाघ, बाबूराव जाधव, सईद जाफर, अमर अलंजाकर, अभिजित गायकवाड, शरद दळवी, शांताराम सोनवणे आदी उपस्थित होते. वाहतूक शाखेच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियान १७ फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणार असून, विविध उपक्रम राबविणार येणार आहे.

- कॅप्शन : वेरूळ लेणी भागात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती करताना पोलीस.

Web Title: Road safety campaign in Eluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.