महानगरातील रस्ते चकाचक होणार
By Admin | Published: August 27, 2014 12:41 AM2014-08-27T00:41:35+5:302014-08-27T00:42:00+5:30
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील जर्जर झालेल्या रस्त्यांचे पक्के डांबरीकरण करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे.
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील जर्जर झालेल्या रस्त्यांचे पक्के डांबरीकरण करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. या रस्त्यासाठी निविदाही काढण्यात आल्या असून, पावसाळा संपताच रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
सिडको वाळूज महानगर-१ व २ मधील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे या खड्ड्यात पाणी साचत असून, ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना खड्डे दिसत नसल्यामुळे छोटे-मोठे अपघात घडत आहेत.
रस्ते तसेच सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात, यासाठी काँग्रेसचे नारायण हातोले, सिद्राम पारे, दुर्गा निंबोळकर आदींनी सिडको प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला आहे.
सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी या भागातील प्रलंबित प्रश्न प्राधान्यक्रमाने निकाली काढून नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले
आहेत.
रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्यामुळे सिडको प्रशासनाने सिडको वाळूज महानगर- १ व २, वडगाव- तीसगाव रोड, म्हाडा कॉलनी परिसरातील संपूर्ण रस्त्यांचे पक्के डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.