वाळूज उद्योगनगरीत खड्ड्यांत हरवले रस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 22:38 IST2019-07-09T22:38:29+5:302019-07-09T22:38:39+5:30
वाळूज उद्योगनगरीतील जी.एचसहअनेक सेक्टरमध्ये खड्ड्यांत रस्ते हरवले असून, या खड्ड्यांमुळे वाहनधारक व उद्योजकांची डोकेदुखी वाढली आहे.

वाळूज उद्योगनगरीत खड्ड्यांत हरवले रस्ते
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील जी.एचसहअनेक सेक्टरमध्ये खड्ड्यांत रस्ते हरवले असून, या खड्ड्यांमुळे वाहनधारक व उद्योजकांची डोकेदुखी वाढली आहे. एमआयडीसी प्रशासनाकडून खड्डे बुजविण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे उद्योजकात नाराजीचा सूर उमटत आहेत.
एमआयडीसी प्रशासनाकडून दोन-तीन वर्षांपूर्वी वाळूज औद्योगिक परिसरातील रस्त्याची कामे पूर्ण करण्यात आलेली आहे. आजघडीला औद्योगिक परिसरातील विविध सेक्टरमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत.
वाळूज औद्योगिक परिसरातील कारखान्यातून तयार होणारा माल व साहित्य तसेच कच्च्या व पक्क्या मालाची ने-आण करण्यासाठी देशाच्या विविध भागांतून वाहने येतात. या परिसरात असलेल्या खड्डयांमुळे कंपनीत माल पोचविणाऱ्या तसेच कंपनीतील माल बाहेर घेऊन जाणाºया वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
रात्रीच्या वेळी खड्डयाचा अंदाज येत नसल्यामुळे वाहने खड्डयांत आदळून नादुरुस्त होत आहेत. खड्डे बुजविण्याकडे एमआयडीसी प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे उद्योजक व वाहनधारकांत नाराजीचा सूर आहे.