वाळूज महानगरात रस्ते निर्मनुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:02 AM2021-04-21T04:02:07+5:302021-04-21T04:02:07+5:30

--------------------------- वाळूज-रांजणगाव रस्त्यावर धुळीचे साम्राज्य वाळूज महानगर : वाळूज- रांजणगाव रस्त्याचे काम अर्धवट असल्याने ये- जा करणाऱ्यांना त्रास ...

Roads in the Waluj metropolis are deserted | वाळूज महानगरात रस्ते निर्मनुष्य

वाळूज महानगरात रस्ते निर्मनुष्य

googlenewsNext

---------------------------

वाळूज-रांजणगाव रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

वाळूज महानगर : वाळूज- रांजणगाव रस्त्याचे काम अर्धवट असल्याने ये- जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील जामा मशीदपर्यंत सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. मात्र, आरोग्य केंद्रापर्यंत करण्यात आलेले डांबरीकरण गतवर्षी पावसात वाहून गेल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खडी निखळली असून, ये- जा करणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे धूळ उडत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

---------------------------------

दुभाजकावरील पथदिवे बनले शोभेची वस्तू

वाळूज महानगर : पंढरपुरात रस्ता दुभाजकावरील पथदिवे बंद असल्याने हे पथदिवे केवळ शोभेची वस्तू बनले आहेत. औरंगाबाद- नगर या रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यानंतर वाळूज ते गोलवाडी फाटा यादरम्यान दुभाजकावर पथदिवे बसविण्यात आले होते. मात्र, या पथदिव्यांच्या बिलावरून एमआयडीसी, सिडको व स्थानिक ग्रामपंचायतीत वाद सुरू असल्याने हे पथदिवे बंद पडले आहेत. या रस्त्यावरील पथदिवे सुरू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

-------------------------

सिडको महानगरात सुरळीत पाणीपुरवठा करा

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत. गत आठवडाभरापासून सिडको परिसरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. या परिसरातील कल्याणी सिटी, सारा व्यंकटेश आदी सोसायटींमध्ये अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहेत.

------------------------------

फळ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ

वाळूज महानगर : वाळूज महानगरात निर्बंधांमुळे फळ विक्रेत्यांना वेळेचे निर्बंध घालण्यात आले आहे. सध्या फळ विक्रीचा व्यवसाय तोट्यात असून, आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे शाहरुख शेख, समीर शेख, सुरेश गायकवाड, सुंदर शर्मा आदी विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

-------------------------

Web Title: Roads in the Waluj metropolis are deserted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.