चोरट्यांनी मारहाण करीत पैसे तर लुटलेच सोबत तरुणाची पॅन्टही पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 05:16 PM2018-10-29T17:16:42+5:302018-10-29T17:25:29+5:30

बीड बायपास परिसरातील नातेवाईकांकडे पायी निघालेल्या तरुणावर चौघांनी हल्ला करून त्याला लुटले.

The robbers looted money and looted the pants of the youth | चोरट्यांनी मारहाण करीत पैसे तर लुटलेच सोबत तरुणाची पॅन्टही पळविली

चोरट्यांनी मारहाण करीत पैसे तर लुटलेच सोबत तरुणाची पॅन्टही पळविली

googlenewsNext

औरंगाबाद : बीड बायपास परिसरातील नातेवाईकांकडे पायी निघालेल्या तरुणावर चौघांनी हल्ला करून त्याला लुटले. तो खिशातील पैसे काढू देत नसल्याच्या दिसताच  चारही चोरट्यांनी चक्क त्याची पॅन्टच काढून पळ काढल्याची खळबळजनक घटना आठ दिवसांपूर्वी बीड बायपास परिसरातील देशी दारू दुकानाजवळ घडली. या पॅन्टमध्ये रोख २ हजार ७५० रुपये आणि चार हजारांचा मोबाईल होता.

गेल्या काही महिन्यांपासून शहरात वाटमारी, लुटमारीचे प्रकार वाढले आहेत. लुटमार करणारे चोरटे काय करतील, याचा नेम राहिला नाही. १८ आॅक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त नातेवाईकांनी जेवणासाठी बोलावल्याने प्रवीण बबनराव कुलथे (वय ३५, रा. राजनगर, मुकुंदवाडी परिसर) हे बीड बायपासकडे पायी जात होते. सायंकाळी साडेसहा ते पावणेसात वाजेच्या सुमारास ते एकटेच पायी जात असल्याचे देशी दारूच्या दुकानाजवळील मैदानावर उभा असलेल्या चौघांनी पाहिले. 

कुलथे पुढे जात असताना चौघा जणांनी अचानक मागून हल्ला चढविला. चौघेही कुलथे यांचे खिसे चाचपडत होते. कुलथे यांनी खिसे पक्के धरल्याने चोरट्यांनी त्यांच्या तोंडावर जोरात ठोसा मारल्याने ते रक्तबंबाळ झाले. चोरट्यांनी चक्क कुलथे यांची पॅन्ट काढून पळ  काढला. या प्रकारानंतर अर्धनग्न अवस्थेतच त्यांना घर गाठावे लागले. तोंडाला जखम झाल्याने वैद्यकीय उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झाले. उपचार पूर्ण झाल्यानंतर २७ आॅक्टोबर रोजी त्यांनी याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड तपास करीत आहेत.

Web Title: The robbers looted money and looted the pants of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.