तोतया पोलिसांने रुग्णाच्या औषधोपचाराचे पैसे लुबाडले
By Admin | Published: September 11, 2016 03:32 PM2016-09-11T15:32:29+5:302016-09-11T15:32:29+5:30
हरात तोतया पोलिसांकडून ग्रामीण आणि खेड्यापाड्यातील लोकांना धमकावून लुटण्याचे प्रकार जोरात सुरू आहेत.
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ११ - शहरात तोतया पोलिसांकडून ग्रामीण आणि खेड्यापाड्यातील लोकांना धमकावून लुटण्याचे प्रकार जोरात सुरू आहेत. गत महिन्यात एमजीएम आणि जालना रोडवर तोतयाने दोन जणांना तर शासकीय कॅन्सर हॉस्पिटलजवळ एकाला लुटले होते. या घटना ताज्या असतानाच ९ सप्टेंबर रोजी रात्री आणखी रुग्णाच्या नातेवाईकास धमकावून त्यांच्याकडील १० हजार ५००रुपये काढून घेतले.
पोलिसांनी सांगितले की, बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथील रहिवासी उस्मान शहा (५५)हे शेतकरी मुलाच्या उपचारासाठी औरंगाबादेतील एमजीएम रुग्णालयात आले होते.
मुलाच्या औषधोपचारासाठी त्यांनी १० हजार ५००रुपये सोबत आणलेले होते. ते बीडी ओढण्यासाठी रुग्णालयाच्या बाहेर आले. यावेळी अंदाजे ५० वर्ष वयाचा एक जण त्यांच्याजवळ आला. यावेळी त्याने कहा घुम रहे हो,तुम गांजा पीते क्या,असे म्हणून पोलिस असल्याची त्याने बतावणी केली.
यावेळी उस्मानशहा यांनी त्यांना मी साधा शेतकरी असून मुलाच्या उपचारासाठी येथे आलो असल्याचे सांगितले. तेव्हा आरोपीने त्यांना दरडावून बळजबरीने त्यांची अंगझडती घेण्यास सुरवात केली. यावेळी त्याने पैजामाच्या खिशात प्लास्टीकच्या पिशवीत ठेवलेले रोख १० हजार ५००रुपये काढून घेतले. त्यानंतर तो भामटा तेथून पसार झाला. या घटनेनंतर घाबरलेल्या उस्मानशहा यांनी दुसाºया दिवशी सिडको पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस नाईक उबाळे हे तपास करीत आहेत.