राजपूत वस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:04 AM2021-05-09T04:04:32+5:302021-05-09T04:04:32+5:30

लासूर स्टेशन : सिद्धनाथ वाडगावपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या राजपूत वस्तीवर शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास सात ते आठ ...

Robbery on Rajput settlements | राजपूत वस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ

राजपूत वस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ

googlenewsNext

लासूर स्टेशन : सिद्धनाथ वाडगावपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या राजपूत वस्तीवर शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. येथील एका शेतकऱ्याच्या गळ्याला चाकू लावून कुटुंबातील अन्य सदस्यांना मारहाण करीत घरातील रोख रक्कम साठ हजार, तीस हजार किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व दुचाकी चोरून घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला.

सिद्धनाथ वाडगाव ते जुना झोडेगाव रस्त्यालगत राजपूत वस्ती आहे. शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास येथील जगदीश राजपूत यांच्या कुटुंबावर अचानक हल्ला झाला. काही समजण्याच्या आतच सात ते आठ जण त्यांच्या घरासमोर जमा झाले. घराच्या अंगणात झोपलेल्या कुटुंबातील सदस्यांना धमकी देत जगदीश राजपूत यांच्या गळ्याला चाकू लावून धमकावले. त्यांच्याकडील साठ हजार रुपये रोख रक्कम, तीस हजार किमतीचे दागिने व घरासमोरील दुचाकी लंपास केली. दरम्यान, जगदीश राजपूत यांच्या मोठ्या मुलाने विरोध केला असता त्याला दरोडेखोरांनी दांड्याने मारहाण करून जखमी केले.

मोबाईल टाकले फोडून

शेतवस्ती असल्याने घरे अंतराने होती. त्यामुळे मदतीला देखील कोणी येणे शक्य नव्हते. त्यात सगळीकडे अंधार पसरलेला होता. दरोडेखोरांनी राजपूत यांच्याकडील मोबाईल फोडून टाकीत घटनास्थळावरून पळ काढला. काही वेळाने कुटुंबीयांनी आरडाओरड केल्यावर शेतवस्तीवरील लोक धावत आले. घटनेची माहिती शिल्लेगाव पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर, पोलीस नाईक संतोष धाडबळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकास पाचारण करण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला.

Web Title: Robbery on Rajput settlements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.