खुलताबादेत एकाच रात्री तीन घरे फोडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 01:26 PM2019-08-03T13:26:59+5:302019-08-03T13:29:34+5:30

भद्रा कॉलनीत गेल्या वर्षभरापासून चोरट्यांचा धुमाकुळ 

robbery in Three houses in one night at khulatabad | खुलताबादेत एकाच रात्री तीन घरे फोडली 

खुलताबादेत एकाच रात्री तीन घरे फोडली 

googlenewsNext

खुलताबादेत एकाच रात्री तीन घरे फोडली 

खुलताबाद (औरंगाबाद ) :  येथील भद्रा कॉलनीत शुक्रवारी (दि.२)  चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरात चोरी करुन दागदागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. गेल्या वर्षभरात भद्रा कॉलनीत आठ ते दहा घरात चोरी झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. 
शुक्रवारी रात्री संजय बन्सी करपे , दत्ता प्रकाश खुंटाळे, साखराबाई बारगळ यांची घरे चोरांनी फोडली. तिन्ही घरातील रहिवासी भद्रा मारूती मंदीर परिसरात विविध धार्मिक साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात. श्रावण महिन्याचा पहिला शनिवार असल्याने ते शुक्रवारी रात्री मंदिर परिसरात गेले होते. चोरांनी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान तिन्ही घरे फोडण्यात आली. संजय करपे यांच्या घरातील दागिने व रोख रक्कम असा 50 ते 60 हजाराचा ऐवज, दत्ता प्रकाश खुंटाळे यांचा ४ हजार रोख व 20 हजाराचे दागिने तर साखराबाई बारगळ यांची दागिने आणि रोख 20 हजार रूपये चोरून चोरट्यांनी लंपास केली. 
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक चंदन इमले यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरिक्षक भगवान झरेकर, पोहेकॉ यतीन कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
भद्रा कॉलनीत दहशत 
भद्रा मारूती मंदीराच्या परिसरात असलेल्या भद्रा कॉलनीत गेल्या वर्षभरापासून चो-यांचे सत्र सुरूच आहे. आतापर्यंत लहानमोठ्या जवळपास दहा घरात चोरीच्या घटना झाल्या आहेत. वर्षभरापूर्वी मिलींद गोसावी यांच्या घरात मोठी चोरी झाली होती जवळपास तीन ते चार लाख रूपयाचे दागिने लंपास केले होते. त्यानंतर जयराज नागे यांच्या घरातून जवऴपास दीड लाख रूपयांचा  ऐवज चोरीला गेला होता. श्रीकांत कुलकर्णी, राजेंद्र दांडेकर, रवी भागवत, पुसे  यांच्या घरी चोरी झाली होती. या चोरींच्या घटनांचा अद्याप तपास लागलेला नाही. यातच पुन्हा तीन घरांमध्ये चोरी झाली. 
 

Web Title: robbery in Three houses in one night at khulatabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.