रोहयो कामांचे रेकॉर्ड गायब; चौकशी सरकेना पुढे

By Admin | Published: November 22, 2015 11:25 PM2015-11-22T23:25:50+5:302015-11-22T23:43:02+5:30

व्यंकटेश वैष्णव , बीड रोहयो अंतर्गत बोगस कामे करून पन्नास लाखांहून अधिक खर्च केलेल्या गावांतील कामांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समित्यांना संबंधीत यंत्रणा सहकार्य करत

Robo's work record disappears; Next to the inquiry | रोहयो कामांचे रेकॉर्ड गायब; चौकशी सरकेना पुढे

रोहयो कामांचे रेकॉर्ड गायब; चौकशी सरकेना पुढे

googlenewsNext


व्यंकटेश वैष्णव , बीड
रोहयो अंतर्गत बोगस कामे करून पन्नास लाखांहून अधिक खर्च केलेल्या गावांतील कामांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समित्यांना संबंधीत यंत्रणा सहकार्य करत नसल्याची माहिती समोर येऊ लागली आहे. चौकशी कामात अडथळा निर्माण करत असलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत जिल्हा प्रशासन असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
रोहयो अंतर्गत केलेल्या कामांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समित्यांना ७ नोव्हेंबर पर्यंत अहवाल मागविला होता. यामध्ये सोळा पैकी दोन गावांचे चौकशी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहेत.
घोटाळे केले नाहीत तर माहिती लपवता का?
ज्या गावांमध्ये पन्नास लाखा पर्यंत रोहयो अंतर्गत कामे झालेली आहेत व मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. तेथे जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली आहे. जर सदरील गावात रोहयो मध्ये भ्रष्टाचार झाला नाही तर चौकशी समितीला माहिती देण्याऐवजी मस्टर गायब करणे, चौकशी समिती गावात आल्यानंतर गैरहजर रहाणे असे प्रकार होत आहेत. घोटाळे केले नाहीत तर माहिती लपवता का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Robo's work record disappears; Next to the inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.