कासोडा येथे स्मशानभूमीचे छत कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 09:31 PM2019-06-11T21:31:06+5:302019-06-11T21:31:15+5:30
कासोडा येथील सार्वजनिक स्मशानभूमीचे छत मंगळवार कोसळले.
वाळूज महानगर : कासोडा येथील सार्वजनिक स्मशानभूमीचे छत मंगळवार कोसळले. निकृष्ट दजाचे काम झाल्यामुळे छत पडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावातील सार्वजनिक स्मशानभूमीच्या शेडची दुरावस्था झाल्याने नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने आरसीसीचे शेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. साधारणपणे दीड वर्षापूर्वी ग्रामपंचायतीच्या वतीने याचे काम पूर्ण करण्यात आले.
आरसीसी बांधकाम झालेल्या या स्मशानभुमीचे छत मंगळवारी दुपारी अचानक कोसळले. गुणवत्तापुर्वक काम न झाल्यामुळे या स्मशानभूमीचे छत कोसळले असल्याचा आरोप काँग्रेसचे गंगापूर तालुका उपाध्यक्ष सारंगधर जाधव यांनी केला आहे.
या प्रकारास जबाबदार असणाऱ्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्याविरुध्द गुन्हे दाखल करण्याची मागणीही जाधव यांनी केली आहे. या प्रकरणी सरपंच वैद्य व ग्रामसेवक साठे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो संपर्क होऊ शकला नाही.