रोटरी क्लब दोन पुरस्कारांनी सन्मानित

By Admin | Published: July 16, 2017 12:19 AM2017-07-16T00:19:11+5:302017-07-16T00:21:33+5:30

जालना : शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल रोटरी क्लब आॅफ जालनाचा सर्वोत्तम साक्षरता आणि सर्वोत्तम बाल आरोग्य सेवा पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

Rotary Club honored by two awards | रोटरी क्लब दोन पुरस्कारांनी सन्मानित

रोटरी क्लब दोन पुरस्कारांनी सन्मानित

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल रोटरी क्लब आॅफ जालनाचा सर्वोत्तम साक्षरता आणि सर्वोत्तम बाल आरोग्य सेवा पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
अहमदनगर येथे ९ जुलै रोजी रोटरी इंटरनॅशनलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रांतपाल प्रमोद पारीख आणि माजी प्रांतपाल रवी वदलमानी यांच्या हस्ते सदरील पुरस्कार प्रदान करण्यात आले.
क्लबचे अध्यक्ष डॉ. नीलेश सोनी, सचिव वीरेंद्र देशपांडे यांनी सांगितले की, रोटरी क्लबने २०१६-१७ या वर्षात साक्षरता अभियानांतर्गत १८५ शाळांमध्ये ई-लर्निंग संच वितरित करण्यात आले. याशिवाय शिक्षकांना क्लबतर्फे नेशन बिल्डर अ‍ॅवॉर्ड प्रदान करण्यात आले. अनेक शाळांच्या ग्रंथालयांसाठी पुस्तके देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सात ठिकाणी हात धुण्याचे यंत्र देण्यात आले. टचिंग लिटील हर्ट्स या प्रकल्पांतर्गत २२५ नवजात तसेच लहान मुलांची हृदयरोग तपासणी करून २१ बालकांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी क्लबने योगदान दिले आहे. या कार्याची दखल घेऊन डिस्ट्रीक्ट ३१३२, रिजन २ मध्ये सर्वोत्तम अध्यक्षाचा पुरस्कार क्लबचे अध्यक्ष डॉ. नीलेश सोनी यांना प्रदान करण्यात आला. नेत्रदान, आरोग्य, अन्न भेसळ याबाबत जनजागृती करण्यासाठी क्लबचा सातत्याने पुढाकार राहिलेला आहे.

Web Title: Rotary Club honored by two awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.