तलाठी परीक्षेसाठीचे १० लाख रु. पाण्यात
By Admin | Published: September 15, 2015 12:12 AM2015-09-15T00:12:19+5:302015-09-15T00:36:46+5:30
औरंगाबाद : जिल्हा निवड समितीने रविवारी रिक्त असलेल्या १० तलाठी पदांसाठी घेतलेली लेखी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून,
औरंगाबाद : जिल्हा निवड समितीने रविवारी रिक्त असलेल्या १० तलाठी पदांसाठी घेतलेली लेखी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून, १५ सप्टेंबर रोजी परीक्षेची तारीख जाहीर होणार आहे. असे असले तरी रविवारच्या परीक्षेचा अंदाजे १० लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेला असून, नवीन परीक्षेसाठीदेखील तेवढाच खर्च होणार आहे. कालच्या परीक्षेचा खर्च प्रश्न आणि उत्तरपत्रिकांमध्ये घोळ करणाऱ्या संस्थेकडून वसूल केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहरातील १५ परीक्षा केंद्रांवर तलाठी पदासाठी लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सुमारे ३ हजार ५०० उमेदवार उपस्थित होते.
उमेदवारांना परीक्षेदरम्यान १०० प्रश्नांची प्रश्नपत्रिका आणि ८० पर्यायांची उत्तरपत्रिका देण्यात आली.
सामान्य ज्ञानाचे प्रश्न सोडून उर्वरित ८० प्रश्न सोडवावेत, असे जिल्हा निवड समितीने ऐन वेळी आदेश काढले. त्यामुळे परीक्षार्थींचा पुरता गोंधळ उडाला. सामान्य ज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण होताच जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे व निवड समिती सदस्यांनी रविवारी झालेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.१
१५ परीक्षा केंद्रे होती. ५ रुपये प्रति उमेदवार आसनव्यवस्थेचा खर्च केंद्रांना देण्यात येतो. त्यासाठी अंदाजे २५ हजार १६० रुपयांचा खर्च झाला. केंद्रावर ४१४ समवेक्षक, लिपिक, शिपाई कार्यरत होते. २ लाखांच्या आसपास त्यांचे मानधन असू शकते. २
स्टेशनरी व इतर साहित्यासाठी ५० हजारांपर्यंत खर्च झाला असेल. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका छपाईसाठी ५ लाखांचा खर्च झाला असेल. ८ ते १० लाख रुपयांच्या दरम्यान त्या परीक्षेचा खर्च झाला असावा. तेवढाच खर्च आता पुन्हा नव्याने करण्यात येणार आहे.