शहीद किरण थोरात यांच्या कुटुंबाला ११ लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 11:26 PM2018-06-02T23:26:24+5:302018-06-02T23:51:32+5:30

वैजापूर : आरतीताई, तुम्ही एकट्या नाहीत, तालुक्यातील लाखो भाऊ अखेरच्या श्वासापर्यंत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, अशा शब्दात वैजापूरचे ...

 Rs 11 lakh to the family of Shaheed Kiran Thorat | शहीद किरण थोरात यांच्या कुटुंबाला ११ लाखांची मदत

शहीद किरण थोरात यांच्या कुटुंबाला ११ लाखांची मदत

googlenewsNext

वैजापूर : आरतीताई, तुम्ही एकट्या नाहीत, तालुक्यातील लाखो भाऊ अखेरच्या श्वासापर्यंत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, अशा शब्दात वैजापूरचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती यांनी शहीद जवान किरण थोरात यांच्या वीरपत्नी आरती थोरात व त्यांच्या कुटुंबाला धीर दिला.
तालुक्यातील फकिराबादवाडी येथील जवान किरण पोपटराव थोरात हे गेल्या महिन्यात शहीद झाले. देशसेवेसाठी प्राणार्पण करणाऱ्या या शहीद जवानाच्या कुटुंबियांबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी वैजापूर मर्चंट बँकेतर्फे येथील कृष्णा लॉन्सवर शनिवारी सायंकाळी ऋणनिर्देश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संचेती बोलत होते.
यावेळी वैजापूर मर्चंट बँकेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब संचेती यांनी मर्चंट बँक, कर्मचारी संघटना, व्यापारी संघटना, शिक्षक संघटना व लोकवर्गणीतून जमा झालेली अकरा लाख रुपयांची मदत शहीद किरण थोरात यांच्या कुटुंबियांना दिली. याप्रसंगी कोल्हापूर येथील सुरेश शुक्ला यांच्या ‘जागो हिंदुस्थानी’ या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाने सर्वांची मने जिंकली.
शहीद जवानाच्या कुटुंबाची मिरवणूक
शहीद किरण थोरात यांचे वडील पोपटराव, आई कांताबाई, वीरपत्नी आरती, त्यांची दोन मुले श्रेया व श्रेमस, भाऊ अमोल, रुपाली व अन्य कुटुंबियांची शहरातील आंबेडकर पुतळ्यापासून मिरवणूक काढण्यात आली. कृष्णा लॉन्सवरील कार्यक्रमात ब्रिगेडीयर पातरा, बाळासाहेब संचेती, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब ठोंबरे, मर्चंट बँकेचे चेअरमन विशाल संचेती, उपनगराध्यक्ष साबेरखान, रमेश पाटील बोरनारे, माजी नगराध्यक्ष राजूसिंह राजपूत, अंजली जोशी, नायक शोभाचंद जाधव, प्रा.जव्हार कोठारी यांनी शहीद किरण थोरात यांच्या कुटुंबाविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे वचन दिले. याप्रसंगी बाळासाहेब संचेती यांच्या हस्ते मान्यवरांना व एनसीसीच्या छात्रांना रोपटे भेट देण्यात आले व शहीद किरण थोरात यांच्या कुटुंबियांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले. कार्यक्रमाला जि.प. सदस्य पंकज ठोंबरे, नगरसेवक शैलेश चव्हाण, डॉ. नीलेश भाटिया, दीपकसिंह राजपूत, प्रशांत सदाफळ, विजय दायमा, कैलास साखरे, सावनसिंग राजपूत, पारस घाटे, प्रमोद जगताप, उल्हास ठोंबरे, डॉ.अमोल अन्नदाते, संजय निकम, राजेंद्र साळुंखे, डॉ.अभिजित अन्नदाते, मेजर सोमनाथ पालवे, काजू काजी, रयस चाऊस, विष्णू जेजूरकर, धोंडिरामसिंह राजपूत, नितिन सोमानी, रवी संचेती, संजय गायकवाड,अल्ताफ बाबा आदींसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title:  Rs 11 lakh to the family of Shaheed Kiran Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.