पैठणमध्ये भरदिवसा १५ लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:10 AM2018-02-13T00:10:21+5:302018-02-13T00:10:43+5:30

पैठणमध्ये भरदिवसा १५ लाखांची चोरी झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील गोदावरी कॉलनीतील अन्नपूर्णा मायक्रो फायनान्स कंपनीच्या कार्यालयातून सोमवारी सकाळी ८ ते ९ वाजेच्या दरम्यान जवळपास १५ लाख रुपयांची रोकड चोरीस गेल्याची खबर या कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापकाने पोलिसांना दिली.

 Rs 15 lakh theft in Paithan | पैठणमध्ये भरदिवसा १५ लाखांची चोरी

पैठणमध्ये भरदिवसा १५ लाखांची चोरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : पैठणमध्ये भरदिवसा १५ लाखांची चोरी झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील गोदावरी कॉलनीतील अन्नपूर्णा मायक्रो फायनान्स कंपनीच्या कार्यालयातून सोमवारी सकाळी ८ ते ९ वाजेच्या दरम्यान जवळपास १५ लाख रुपयांची रोकड चोरीस गेल्याची खबर या कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापकाने पोलिसांना दिली.
याबाबत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी येऊन पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद देणार असल्याचे कंपनीच्या व्यवस्थापकाने सांगितले. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेले नव्हते. पोलीसदेखील या वरिष्ठ अधिकाºयांची प्रतीक्षा करत असल्याचे दिसून आले. उपविभागिय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, पोलीस निरीक्षक चंदन इमले, सहायक पोलीस निरीक्षक वारे, फौजदार सोनवने आदींनी कंपनी कार्यालयात जाऊन पाहणी केली.
नाष्टा करायला गेलो अन् चोरी
अन्नपूर्णा माईक्रो फायनान्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक इरफान सय्यद यांनी या चोरीची माहिती देताना सांगितले की, गेल्या तीन दिवसांचे १४, ९८, ०६५ रूपयांचे कलेक्शन कार्यालयात जमा होते. दरम्यान, शनिवार, रविवार अशा दोन दिवस बँकेला सुटी असल्याने रक्कम बँकेत भरता येत नसल्याने ती कार्यालयातील लोखंडी कपाटात ठेवण्यात आली होती. कार्यालयात रक्कम जास्त असल्याने माझ्यासह कार्यालयातील इतर कर्मचारी कार्यालयातच मुक्कामी होतो. सोमवारी सकाळी ८ वाजता नाष्टा करण्यासाठी आम्ही कार्यालयास कुलूप लावून कार्यालय सोडले. ९ वाजेच्या सुमारास नाष्टा करून परत आलो असता कार्यालयाचा दरवाजा उघडा होता व लोखंडी कपाट तुटलेले होते. कपाटातील रोख रक्कम गायब होती. अन्नपूर्णा मायक्रो फायन्यस प्रा. लिमिटेड कंपनीची नोंदणी आरबीआयकडे असून कंपनीचे मुख्य कार्यालय खंडगिरी भुवनेश्वर, ओडीसा राज्यात आहे. ही नाँन बँकींग फायनान्स कंपनी असून फक्त महिला बचत गटाला ही कंपनी फायनान्स करते. गेला दीड वर्षांपासून अन्नपूर्णा पैठण तालुक्यात महिला बचत गटाला कर्ज वाटप करत आहे. पैठण तालुक्यातील १९० बचत गटांना जवळपास ५ कोटी रूपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले असल्याचे सय्यद यांनी सांगितले. दरम्यान, औरंगाबाद विभागात या कंपनीच्या १६ शाखा आहेत. बचत गटाकडून आलेले कलेक्शन कंपनीचे खाते असलेल्या शहरातील आयसीआय बँकेत जमा करण्यात येते.
कार्यालय निवासी भागात
कंपनीचे कार्यालय घरगुती घर भाडेकरारावर घेऊन सुरू करण्यात आले आहे. कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर घरमालक, पाठीमागे दुसरे भाडेकरू, दोन्ही बाजूला दोन घरे खेटून खेटून आहेत. सकाळी सर्व नागरिक वावरत असताना या कार्यालयातील लोखंडी कपाट तोडण्याचा आवाज मात्र कुणीच ऐकला नाही. चोरट्यांनी लोखंडी कपाटाचा एक दरवाजाच तोडून बाजूला काढून ठेवलेला आहे.
चोरीबाबत खबर मिळताच आम्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. याबाबत संबंधितांनी अद्याप तक्रार दिलेली नसून पोलीस यंत्रणेने गांभीर्याने हे प्रकरण घेतले आहे. चोरीच्या सर्व शक्यतेची पडताळणी करण्यात येत असून त्यानंतरच पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांनी सांगितले.

Web Title:  Rs 15 lakh theft in Paithan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.