बीड शहरानजीक ८० लाखांचे फटाके जप्त

By Admin | Published: October 26, 2015 11:58 PM2015-10-26T23:58:59+5:302015-10-27T00:27:52+5:30

बीड : शहरापासून जवळच असलेल्या जिरेवाडी फाटा येथील एका दोन मजली इमारतीत पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या विशेष पथकाने सोमवारी रात्री छापा टाकला.

Rs 80 lakh cracks in Beed city | बीड शहरानजीक ८० लाखांचे फटाके जप्त

बीड शहरानजीक ८० लाखांचे फटाके जप्त

googlenewsNext


बीड : शहरापासून जवळच असलेल्या जिरेवाडी फाटा येथील एका दोन मजली इमारतीत पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या विशेष पथकाने सोमवारी रात्री छापा टाकला. जवळपास ८० लाख रूपयांचा फटाक्यांचा साठा आढळून आला आहे. कारवाईची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
राजेश तुलसीदास टेकवाणी (रा. सय्यदनगर, बीड), सतीश भगवानआप्पा नगरे (रा. बुरूडगल्ली, बीड), सुनील गोवर्धनदास कुकडेजा (रा. सय्यदनगर, बीड), मयूर हरेश कुकडेजा (रा. सय्यदनगर, बीड), जयकिशन अवतराय टेकवाणी (रा. सहयोगनगर, बीड) व किरण कुलकर्णी अशी ताब्यात घेतलेल्या फटाके विक्रेत्यांची नावे आहेत.
जिरेफाट्यानजीक असलेल्या हॉस्पिटलसमोरील शिवशंकर या दुमजली इमारतीमध्ये फटाक्यांचा मोठा साठा करून ठेवला असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने त्या ठिकाणी सोमवारी रात्री आठच्या सुमारास छापा टाकला. पहिल्या मजल्यावरील शटरसह १६ खोल्यांमध्ये फटाक्यांचे बॉक्स आढळून आले. या संदर्भात पोलिसांनी काही व्यक्तींना बोलावून घेतले.
त्यांच्याकडे विचारपूस केली असता हा माल ७० ते ८० लाख रूपयांचा असल्याचे त्यांनी मान्य केले. फटाक्यांचा साठा बाहेर काढून पोलिसांनी त्या मालाच्या मोजमापाला सुरूवात केल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
फटाक्याचा साठा करताना त्याचा परवाना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घ्यावा लागतो. ज्या ठिकाणी साठा करावयाचा आहे. त्याच ठिकाणी तो केला पाहिजे असा नियम आहे.
४दुसरा नियम म्हणजे ४५० किलो फटाक्यांचा माल ठेवण्याची परवानगी आहे. त्यापेक्षा अधिक आढळून आला तर कारवाई होते.
४पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जिरेवाडी फाट्यानजीक याच दोन मुद्द्यांवर फटाक्याच्या साठ्यावर छापा टाकला आहे. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.

Web Title: Rs 80 lakh cracks in Beed city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.