शेतीपंपांची थकबाकी ९ हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:45 AM2017-10-13T00:45:51+5:302017-10-13T00:45:51+5:30

महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जळगाव, नांदेड व लातूर परिमंडळातील ११ जिल्ह्यांचा समावेश असून, या जिल्ह्यांमध्ये शेतीपंपांच्या वीज ग्राहकांकडे तब्बल ९ हजार ७३७ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

Rs 9,000 crore pending bill of agricultural pumps | शेतीपंपांची थकबाकी ९ हजार कोटी

शेतीपंपांची थकबाकी ९ हजार कोटी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जळगाव, नांदेड व लातूर परिमंडळातील ११ जिल्ह्यांचा समावेश असून, या जिल्ह्यांमध्ये शेतीपंपांच्या वीज ग्राहकांकडे तब्बल ९ हजार ७३७ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत मंडळ कार्यालयांमधील शेतीपंप वीज ग्राहकांकडे असलेली थकबाकी पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये औरंगाबाद शहर मंडळांतर्गत २ हजार ४२ वीज ग्राहकांकडे १५ कोटी ८२ लाख रुपये, औरंगाबाद ग्रामीण मंडळांतर्गत २ हजार १२ हजार ४७४ वीज ग्राहकांकडे १ हजार ३४८ कोटी ५३ लाख रुपये, जालना मंडळांतर्गत १ लाख १९ हजार ९४० ग्राहकांकडे ९५० कोटी ४६ लाख रुपये, जळगाव मंडळांतर्गत १ लाख ९२ हजार ८२३ ग्राहकांकडे १ हजार ५६८ कोटी २८ लाख रुपये, नंदुरबार मंडळांतर्गत ४७ हजार ६०७ वीज ग्राहकांकडे ३६० कोटी ६५ लाख रुपये, धुळे मंडळांतर्गत ८८ हजार ८२८ ग्राहकांकडे ६०५ कोटी ८६ लाख रुपये, नांदेड मंडळांतर्गत १ लाख २२ हजार ३८४ ग्राहकांकडे ८७९ कोटी ३९ लाख रुपये, परभणीमध्ये ९२ हजार ६४८ वीज ग्राहकांकडे ७३८ कोटी ४२ लाख रुपये, हिंगोलीमध्ये ७० हजार ६६० ग्राहकांकडे ५०३ कोटी ८३ लाख रुपये, लातूर मंडळांतर्गत १ लाख २१ हजार ७१० ग्राहकांकडे ७३१ कोटी ४३ लाख रुपये, बीड मंडळांतर्गत १ लाख ६७ हजार ३३४ ग्राहकांकडे १ हजार १२६ कोटी ५६ लाख रुपये, उस्मानाबाद मंडळांतर्गत १ लाख ४४ हजार ३६३ ग्राहकांकडे ९०७ कोटी ८२ लाख रुपये, असे एकूण १३ लाख ८२ हजार ८१३ शेतीपंपांच्या वीज ग्राहकांकडे ९ हजार ७३७ कोटी ५ लाख रुपयांची थकबाकी आहे. शेती पंपाच्या ग्राहकांनी लवकरात लवकर थकबाकी महावितरण कंपनीकडे भरावी, असे आवाहन प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

Web Title: Rs 9,000 crore pending bill of agricultural pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.