‘आरटीओ’ने केले तब्बल 17 हजार वाहनांना ब्लॅक लिस्ट; देशभरात कुठेही होऊ शकते कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 05:59 PM2020-12-23T17:59:07+5:302020-12-23T18:07:45+5:30

RTO blacklists 17,000 vehicles आरटीओ कार्यालाकडून गेल्या महिनाभरापासून विशेष मोहिम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

RTO blacklists 17,000 vehicles; Action can be taken anywhere in the country | ‘आरटीओ’ने केले तब्बल 17 हजार वाहनांना ब्लॅक लिस्ट; देशभरात कुठेही होऊ शकते कारवाई

‘आरटीओ’ने केले तब्बल 17 हजार वाहनांना ब्लॅक लिस्ट; देशभरात कुठेही होऊ शकते कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देकर थकविलेल्या वाहनधारकांकडून महिना २ टक्के यानुसार व्याज आकारले जातेवर्षानुवर्षे कर थकत असल्याने थकबाकीचा आकडा वाढतच आहे.

औरंगाबाद : आरटीओ कार्यालय सध्या तब्बल १७ हजार वाहनांचा शोध घेत आहे. लाखो रुपयांचा कर या वाहनांनी थकविला आहे. परिणामी, ही वाहने देशभरात ब्लॅक लिस्टवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे ही वाहने देशभरात कारवाईच्या रडारवर आहेत.

आरटीओ कार्यालाकडून गेल्या महिनाभरापासून विशेष मोहिम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. विशेष म्हणजे शनिवारी आणि रविवारी या सुटीच्या दिवशीही वाहनांवर कारवाई केली जात आहे. या महिन्यांत सुटीच्या दिवशी आतापर्यंत ३२७ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यात १९६ वाहने सध्या जप्त करण्यात आले आहे. यातून आतापर्यंत ४४ लाख ७७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. यापूर्वी कर थकवणाऱ्या वाहनांची माहिती आरटीओ कार्यालयास सहजासहजी मिळत नसे; परंतु आरटीओ कार्यालयातील कामकाज ऑनलाईन झाल्याने ही माहिती तात्काळ समोर येते. त्यातून अशी वाहने ब्लॅक लिस्ट केली जातात.

२४ टक्के व्याज आकारणी
कर थकविलेल्या वाहनधारकांकडून महिना २ टक्के यानुसार वर्षाला २४ टक्के व्याज आकारला जातो. वर्षानुवर्षे कर थकत असल्याने थकबाकीचा आकडा वाढतच आहे.

कर भरून कारवाई टाळावी
‘‘नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांबरोबर १७ हजार वाहनांचा शोध घेतला आहे. या वाहनधारकांनी कर थकविला आहे. वाहनधारकांनी कर भरून कारवाई टाळावी. देशभरात या वाहनांवर कारवाई होऊ शकते. 
- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: RTO blacklists 17,000 vehicles; Action can be taken anywhere in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.