आरटीओ ‘नॉट अपडेट’

By Admin | Published: September 12, 2015 11:46 PM2015-09-12T23:46:11+5:302015-09-13T00:08:11+5:30

शिरीष शिंदे , बीड नवीन खरेदी केलेल्या प्रत्येक वाहनाच्या इंजिन, चेसी व क्रमांकाची माहिती उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एनआयसीच्या नॅशनल

RTO 'Not Update' | आरटीओ ‘नॉट अपडेट’

आरटीओ ‘नॉट अपडेट’

googlenewsNext


शिरीष शिंदे , बीड
नवीन खरेदी केलेल्या प्रत्येक वाहनाच्या इंजिन, चेसी व क्रमांकाची माहिती उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एनआयसीच्या नॅशनल रजिस्टरच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येते. मात्र, वाहन चोरांकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनधारकाची माहिती नॅशनल रजिस्टरच्या वेबसाईटवर सर्च केली असता ‘इनफॉर्मेशन नॉट अपडेट’ असा मॅसेज येत असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे मुळ मालकापर्यंत पोहोचणे पोलीस अधिकाऱ्यांना अवघड बनले आहे.
बीड शहरातील पोलीस मुख्यालयावर हरवलेल्या, अनोळखी व्यक्तींचे मृतदेह व वाहन चोरांकडून पकडलेल्या वाहनांची यादी प्रदर्शनात लावली होती. औरंगाबाद परिक्षेत्रात येणाऱ्या सर्व जिल्ह्यातील ८०० वाहनांचा त्यात समावेश होता. कोणत्या पोलीस ठाण्यार्तंगत ही वाहने आहेत हे सुद्धा नमुद करण्यात आले होते. वाहनांची माहिती उपलब्ध होत नसल्याकारणाने अशा वाहनांचे चेसी क्रमांक व इंजिन क्रमांक प्रदर्शनातील पोस्टरवर लावण्यात आली होती.
दरम्यान, बहुतांश वेळा वाहने चोरी केल्यानंतर चोरटे हे त्या वाहनाचा क्रमांक व चेसी नंबर मिटविण्याचा किंवा त्यातील काही नंबर खोडतात. काही वेळा चेसी क्रमांक मिटवुन त्यावर दुसऱ्या वाहनाच्या हुबेहुब चेसी व पासिंग नंबर टाकतात. असे विविध प्रयोग चोरटे करतात.
त्यामुळे पोलिसांनी भरविलेल्या वाहनांची यादी मुळ चेसी क्रमांक असणारी होती हे सांगणे पोलिसांना कठीण आहे.
उप-प्रादेशिक परिवाहन कार्यालयाचा कारभार आॅनलाईन झाला आहे. २००६ पासून पासिंग होताच त्या वाहनाचा इंजिन क्रमांक व चेसी क्रमांक हा एनआयसीच्या नॅशनल रजीस्टरवर अपलोड करण्यात येत आहे. तसेच नॅशलन क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी)च्या वेबसाईटवरही सर्व वाहनांची माहिती असते.
त्यामुळे चोरीचे वाहन जप्त झाल्यास त्याची माहिती नॅशनल रेजिस्टर व एनसीआरबीच्या वेबसाईटवर पोलिसांमार्फत सर्च करण्यात येते. मात्र त्यांनी टाकलेली माहिती अपडेट नसल्याचा मॅसेज वेबसाईटवर दिसतो. त्यामुळे आरटीओमार्फत खरोखरच प्रत्येक वाहनाची माहिती अपलोड होते का ?, हा संशोधनाचा विषय आहे. प्रत्येक वाहनाची माहिती उपलोड झाली असती तर मराठवाड्यात आठही जिल्ह्यातील वाहनांचे क्रमांक प्रदर्शनात भरविण्याची नामुश्कि पोलिसांवर आली नसती. या समस्येमुळे मुळ मालकाला गाडी मिळणे कठीण झाले आहे.
दरम्यान, वाहन चोरीमध्ये नवीन चोरांचा समावेश झाला असल्याने तपास करताना पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहने मिळाली तरी मुळ मालकापर्यंत पोहण्यास अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करवा लागत आहे. या त्रास अनेकांना होत आहे.

Web Title: RTO 'Not Update'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.