‘आरटीओ’ला घातला गंडा
By Admin | Published: July 10, 2016 12:38 AM2016-07-10T00:38:06+5:302016-07-10T00:57:32+5:30
औरंगाबाद : लातूर येथे कार्यरत असलेल्या आरटीओ निरीक्षकालाच दुसऱ्याची कार विक्री करून एक जणाने तब्बल अडीच लाख रुपयांचा गंडा घातला.
औरंगाबाद : लातूर येथे कार्यरत असलेल्या आरटीओ निरीक्षकालाच दुसऱ्याची कार विक्री करून एक जणाने तब्बल अडीच लाख रुपयांचा गंडा घातला. गतवर्षी आॅक्टोबरमध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय सुरेश मालेवार असे आरोपीचे नाव आहे. जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी सांगितले की, दिगंबर भीमराव डोईफोडे (रा. शहानूरवाडी) हे लातूर येथील आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आरोपी हा डोईफोडे यांच्या ओळखीचा आहे. गतवर्षी १४ आॅक्टोबर-२०१५ रोजी आरोपी हा डोईफोडे यांच्या घरी गेला आणि त्याने पैशाची नितांत गरज असल्याचे सांगून त्याच्या मालकीची स्विफ्ट कार (क्रमांक एमएच-२० सीएस ३५८) विक्री करावयाची आहे. पैशाची अत्यंत निकड असल्याने ही कार तुम्हीच खरेदी करा, असे तो म्हणाला. यावेळी त्याने अडीच लाखांत कारचा सौदा केला. त्यानंतर त्याने डोईफोडे यांना सध्या कारची कागदपत्रे जवळ नसल्याने तुम्हाला दोन चार दिवसांत आणून देतो असे सांगितले.