बीड येथील घटनेच्या निषेधार्थ आरटीओ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 08:12 PM2020-12-31T20:12:00+5:302020-12-31T20:13:09+5:30

आरटीओ कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जोरदार घोषणा देत हल्ल्याचा निषेध केला.

RTO workers stop writing to protest the incident in Beed | बीड येथील घटनेच्या निषेधार्थ आरटीओ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

बीड येथील घटनेच्या निषेधार्थ आरटीओ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देबीड येथील कार्यालयात बुधवारी कर्मचाऱ्यावर दोन व्यक्तींनी हल्ला केला.शासनाने आरटीओ कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली

औरंगाबाद : बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी औरंगाबाद आरटीओ कार्यालयाील कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केले. त्यामुळे कार्यालयातील कामकाज काही प्रमाणात विस्कळीत झाले.

आरटीओ कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जोरदार घोषणा देत हल्ल्याचा निषेध केला. यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय कर्मचारी संघटनेचे संघटक तुषार बावस्कर, विक्रमसिंग राजपूत, एम.पी. बनकर, प्रमोद लोखंडे, साहेबराव आइतवार, प्रवीण काकडे, मिलिंद सव्वासे, प्रशांत शिंदे, कारभारी बहुरे, मोहम्मद रहेमान मोहम्मद युसूफ, संतोष अंबिलवादे, धरमसिंग बिघोत, अनिल मगरे, शालिनी आहेर, शारदा गरुड, वंदना माळवदे, मनीषा वासनिक, रेखा कदम आदी उपस्थित होते. लर्निंग, पर्मनंट लायन्ससचे कामकाज सुरळीत होते; परंतु अन्य कामांवर या आंदोलनाचा परिणाम झाला.

शासनाने संरक्षण द्यावे
बीड येथील कार्यालयात बुधवारी कर्मचाऱ्यावर दोन व्यक्तींनी हल्ला केला. यापूर्वीही येथे अशा घटना घडल्या आहेत. शासनाने आरटीओ कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे कर्मचाऱ्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांच्याकडे केली.
 

Web Title: RTO workers stop writing to protest the incident in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.