‘प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या नियमांची घाटीत पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 10:57 PM2018-12-18T22:57:50+5:302018-12-18T22:58:31+5:30

घाटी रुग्णालयात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. मूत्रपिंड विकार विभागाच्या परिसरात बायोमेडिकल वेस्ट साठविण्यात येत आहे. त्यातूनच मोकाट कुत्र्यांच्या तोंडी मांसाचे गोळे लागत आहे. या धक्कादायक प्रकारामुळे रुग्ण आणि नातेवाईकांबरोबर कर्मचाºयांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.

 The rules of 'Pollution Control Board' fall into the valley | ‘प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या नियमांची घाटीत पायमल्ली

‘प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या नियमांची घाटीत पायमल्ली

googlenewsNext
ठळक मुद्देउघड्यावरच वैद्यकीय घनकचरा : बंदिस्त कक्षात बायोमेडिकल वेस्ट साठविण्याकडे दुर्लक्ष, रुग्ण, नातेवाईकांबरोबर कर्मचाऱ्यांचेही आरोग्य धोक्यात

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. मूत्रपिंड विकार विभागाच्या परिसरात बायोमेडिकल वेस्ट साठविण्यात येत आहे. त्यातूनच मोकाट कुत्र्यांच्या तोंडी मांसाचे गोळे लागत आहे. या धक्कादायक प्रकारामुळे रुग्ण आणि नातेवाईकांबरोबर कर्मचाºयांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.
घाटी रुग्णालयातील मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाच्या बाजूला आणि शवविच्छेदनगृहाच्या परिसरात सोमवारी दोन-तीन मोकाट कुत्र्यांच्या तोंडात मांसाचे गोळे पाहायला मिळाले. घाटीतील बायामेडिकल वेस्ट वॉटर ग्रेस संस्थेतर्फे संकलित के ले जाते. बायामेडिकल वेस्ट साठविण्यासाठी बंदिस्त खोली असणे आवश्यक आहे; परंतु आजघडीला घाटीत त्याला खोडा बसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाच्या बाजूला आणि शवविच्छेदनगृहातील मोकळ्या जागेत ओला-सुका कचºयासह बायोमेडिकल वेस्ट साठविण्यात येत आहे. याठिकाणी बॉडी पार्टस्देखील साठविले जात आहे. त्यातूनच मोकाट कुत्र्यांच्या तोंड्यात मांसाचे गोळे पाहायला मिळत असल्याचे दिसते.
बायामेडिकल वेस्टचे नियमानुसार संकलन, साठवणूक आणि विल्हेवाट लावण्याची गरज आहे; परंतु घाटी प्रशासन मोकळ्या जागेत हा कचरा टाकून मोकळे होत आहे. या परिसरात रुग्ण, नातेवाईकांची वर्दळ असते. त्यांचे आरोग्य धोक्यात आणले जात आहे. याठिकाणी दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात बायोमेडिकल वेस्ट जळून खाक झाले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार सूचना देऊनही घाटी प्रशासनाकडून त्याचे पालन होत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
दररोज संकलन
घाटीतील बायोमेडिकल वेस्टचे दररोज संकलन केले जाते. घाटीत एका ठिकाणी कचरा गोळा केला जातो. तेथून कचरा जमा केला जातो. कचरा साठविण्यासाठी बंद कक्ष पाहिजे. घाटी प्रशासनाने मागणी केली तर कर्मचाºयांना कचरा वर्गीकरणासंदर्भात प्रशिक्षण दिले जाईल, असे वॉटर ग्रेस संस्थेचे व्यवस्थापक वैभव बोरा म्हणाले.
जागेची पाहणी
वैद्यकीय घनकचरा साठविण्यासाठी वेगवेगळे कप्पे असलेला कक्ष हवा. हे कप्पे केले जाणार होते; परंतु कक्ष जळून गेला. कचरा साठविला जातो त्या जागेची पाहणी केली. बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकण्यात येत नाही. कचरा साठविण्यासाठी अन्य जागेची पाहणी केली जाईल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांनी सांगितले.
कॅप्शन..
घाटी रुग्णालयात अशाप्रकारे उघड्यावर कचरा फेकण्यात येत आहे.
बायोमेडिकल वेस्टच्या पिशव्याही उघड्यावर टाकण्यात येत आहेत.

Web Title:  The rules of 'Pollution Control Board' fall into the valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.