औरंगाबादेत एटीएममध्ये खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 11:48 PM2018-05-31T23:48:27+5:302018-05-31T23:49:35+5:30

वेतनवाढीसाठी बँक युनियनने पुकारलेल्या दोनदिवसीय संपाचा परिणाम शहरात प्रखरतेने जाणवला. गुरुवारी राष्ट्रीयीकृत बँकांचे बहुतांश एटीएम व सीडीएम मशीन नोटांअभावी कोरडेठाक पडल्या होत्या. याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागला.

Rumble on ATM in Aurangabad ATM | औरंगाबादेत एटीएममध्ये खडखडाट

औरंगाबादेत एटीएममध्ये खडखडाट

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिक त्रस्त : बँक कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वेतनवाढीसाठी बँक युनियनने पुकारलेल्या दोनदिवसीय संपाचा परिणाम शहरात प्रखरतेने जाणवला. गुरुवारी राष्ट्रीयीकृत बँकांचे बहुतांश एटीएम व सीडीएम मशीन नोटांअभावी कोरडेठाक पडल्या होत्या. याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागला.
राष्ट्रीयीकृत बँक कर्मचारी व अधिकाºयांचा नवीन वेतनवाढीचा करार झाला नाही. आयबीएने २ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव ठेवला, पण यास विरोध करून युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने ३० व ३१ मे रोजी दोन दिवस संप पुकारून आपली ताकद दाखवून दिली. मात्र, याचा फटका बँकेच्या ग्राहकांना सहन करावा लागला. संपाच्या पहिल्या दिवशीच शहरातील ७०० पैकी ६० टक्के एटीएम बंद होते.
आज दुसºया दिवशी बहुतांश एटीएममध्ये खडखडाट होता. सिडको, हडको, शहागंज, औरंगपुरा, रेल्वेस्टेशन, जालना रोड ते बीड बायपासपर्यंत सर्व ठिकाणच्या राष्ट्रीयीकृत बँकांचे एटीएम बंदच होते. फक्त दोन ठिकाणी पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम सुरू असल्याचे आढळून आले. सिडकोतील एसबीआयच्या विभागीय कार्यालय व दूध डेअरी चौकातील व शहागंजमधील करन्सीचेस्ट येथील एटीएम मशीन बंद होते. खाजगी बँका, नागरी सहकारी पतसंस्थेचे एटीएम सुरू होते. महिनाअखेरच्या दिवसात राष्ट्रीयीकृत बँक व एटीएम बंद राहिल्याने बँक खातेदारांनी संताप व्यक्त केला.
सुरेंद्र अर्दड या ग्राहकाने सांगितले की, मला आईसाठी औषध घ्यावयाचे होते. त्यासाठी आज सिडको एन-५, एन- ६ व एन-३ परिसरातील ६ एटीएममध्ये जाऊन आलो, पण सर्व बंद होते. अखेर डिजिटल मनीचा वापर करून औषध विक्रेत्याचे बिल फेडले. अश्विनी माने या तरुणीने सांगितले की, परभणी येथून वडिलांनी माझ्या बँक खात्यात पैसे जमा केले होते, पण दोन दिवस एटीएम बंद असल्याने मला रक्कम काढता आली नाही.
नागरिक म्हणतात...
आदित्य जहागीरदार या व्यावसायिकाने सांगितले की, मी समोरच्या पार्टीला धनादेश दिला होता, पण बँक बंद असल्याने तो त्यांना वटविता आला नाही. तर शैलेश सोमाणी यांनी बँक कर्मचाºयांच्या संपावर संताप व्यक्त केला.
ग्राहकांच्या जिवावर बँका चालवितात व आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी ग्राहकांनाच वेठीस धरल्या जाते. बँक युनियनवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. अशाच प्रतिक्रिया अन्य नागरिकांनीही व्यक्त केल्या.
लढून, संघर्ष करून घेऊ वेतनवाढ
‘लढून, संघर्ष करून घेऊ वेतनवाढ’,
‘२ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव ठेवणारी आयबीए मुर्दाबाद,’ अशी घोषणा देत बँक कर्मचारी-अधिकाºयांनी गुरुवारी संताप व्यक्त केला. मागील दोन दिवसांत सुमारे १६०० कोटींचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले. संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा, युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनने यावेळी केला.
यूएफबीयूच्या वतीने गुरुवारी सकाळी सिडकोतील एसबीआय (जुने स्टेट बँक आॅफ हैदराबाद) च्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. राष्ट्रीयीकृत बँकेमधील कर्मचारी एकवटले होते. यावेळी ‘हक्काने घेऊ वेतनवाढ’, ‘यूएफबीयू जिंदाबाद,’ अशा घोषणा देण्यात आल्या.
आयबीएने २ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव ठेवला याचा यावेळी सर्व वक्त्यांनी निषेध व्यक्त केला. यूएफबीयूचे संयोजक देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले की, जन-धन योजना, नोटाबंदी व विविध सरकारी योजनांची यशस्वी अंमलबजावणीत राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाºयांचा मोठा वाटा आहे. मात्र, सरकारला याचा विसर पडला. यावेळी सुनील शिंदे, महेश गोसावी, उत्तम भाकरे, गणेश पैैठणे, हिंदप्रकाश जैस्वाल यांची भाषणे झाली.

Web Title: Rumble on ATM in Aurangabad ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.