बिबट्याच्या हल्ल्याची अफवाच; बायकोला शिट्या मारतो म्हणून तरुणाचा केला खून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 03:59 PM2023-01-03T15:59:35+5:302023-01-03T16:00:45+5:30

लिफ्ट मागत शेतात गेला सोबत अन् केला खून; पोलिसांनी आरोपीस ठोकल्या २४ तासाच्या आत बेड्या

Rumors of leopard attacks; A young man was killed for whistling his wife | बिबट्याच्या हल्ल्याची अफवाच; बायकोला शिट्या मारतो म्हणून तरुणाचा केला खून

बिबट्याच्या हल्ल्याची अफवाच; बायकोला शिट्या मारतो म्हणून तरुणाचा केला खून

googlenewsNext

- श्यामकुमार पुरे
सिल्लोड:(जि. औरंगाबाद) नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी  १ जानेवारीला शेतात गव्हाला पाणी भरण्यास व मटण पार्टीस जाणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणाचा आरोपीने चाकूने हल्ला करून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.तत्पूर्वी त्याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची अफवा सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथे पसरली होती मात्र तो बिबट्याचा हल्ला नसून त्याचा आरोपीनेखून केला असल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे.पोलिसांनी आरोपीस २४ तासाच्या आत जेरबंद केले आहे.

 या घटनेत मयत झालेल्या तरुण युवकाचे नाव रवींद्र अंबादास काजले वय २८ रा रेलगाव असे आहे.तर त्याचा ज्या आरोपीने खून केला त्याचे नाव गणेश कैलास चव्हाण वय २४ वर्ष रा.रेलगाव असे आहे.मायताचा भाऊ समाधान अंबादास याने दिलेल्या फैर्यादी वरून पोलिसांनी सोमवारी रात्री ७.३३ वाजता खुनाचा गुन्हा दाखल केला होता.तर हा खून १ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमाराला रोलगाव ते रेलगाववाडी रोडवर झाला होता.पोलिसांनी आरोपीस सोमवारी मध्यरात्री बेड्या ठोकल्या...

तो बायकोला शिट्या मारत होता..
 मयत  रवींद्र हा आरोपी गणेशच्या  बायकोला  गल्लीतून जाता येता वाईट नजरेने बघत होता तिला शिट्या मारत होता..गणेश ने त्याला अनेक वेळा समजावले असे करू नको पण मयताने ऐकले नाही उलट तुला काय करायचे ते करून घे असे सांगितले म्हणून रागाच्या भरात गणेश ने रवींद्रचा काटा काढल्याची कबुली आरोपीने पोलिसांकडे दिली आहे.ज्या ठिकाणी हा खून झाला त्या ठिकाणी आरोपी चा मोबाईल पडला होता.व तो गुन्हा घडला तेव्हा पासून गावातून फरार झाला होता. त्या मोबाईल च्या माहिती वरून पोलिसांनी या गुन्ह्याचा शोध लावला.

मोटार सायकल वर लिफ्ट मागितली..
सदर शेतकरी रवींद्र हा गव्हाला पाणी देण्यासाठी व पार्टी करण्यासाठी घरातून भाकरी व मटण घेऊन मोटार सायकल होंडा शाहीन क्रमांक एम एच २० डि वाय ०५८५ वर शेतात जात होता .त्याला रस्त्यात रोखून आरोपीने लिफ्ट मागितली. आणि रस्त्यात त्याच्यावर चाकूने हल्ला करून त्याचा खून केला.

२४ तासाच्या आत गुन्हा उघड
सदर शेतकरी बिबट्याच्या हल्यात ठार झाल्याची माहिती आधी पोलिसांना मिळाली होती मात्र घटनास्थळी तशी स्थिती दिसत नव्हती त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे वाटत होतं.मात्र घटनास्थळी मिळालेल्या मोबाईल वरून या घटनेचा तपास करण्यास मोठी मदत मिळाली. व आरोपीस २४ तासात पकडता आले.
- सीताराम मेहेत्रे पोलीस निरीक्षक सिल्लोड ग्रामीण.

यांनी केली कारवाई
ही कार्यवाही पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, फौजदार विकास आढे,पोलीस कर्मचारी सचिन सोनार, अनंत जोशी,कैलास द्वारकुंडे,ज्ञानदेव ढाकणे,रंगराव बावस्कर, यतीन कुलकर्णी, मंगेश राठोड यांनी केली.

Web Title: Rumors of leopard attacks; A young man was killed for whistling his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.