पळा... पळा... बसस्थानकात अतिरेकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:04 AM2017-09-01T00:04:37+5:302017-09-01T00:04:37+5:30

येथील बसस्थानकात ३१ आॅगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पोलीस आणि आतंकवाद्यामध्ये अर्धा तास चकमक सुरू होती. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन आतंकवादी ठार झाले तर दोघांना पकडण्यात यश आले, हा काही खराखुरा प्रसंग नव्हे, तर पोलिसांनी केलेल्या रंगीत तालमीचा भाग होता.

Run ... run away ... bus stop in the bus station! | पळा... पळा... बसस्थानकात अतिरेकी!

पळा... पळा... बसस्थानकात अतिरेकी!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील बसस्थानकात ३१ आॅगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पोलीस आणि आतंकवाद्यामध्ये अर्धा तास चकमक सुरू होती. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन आतंकवादी ठार झाले तर दोघांना पकडण्यात यश आले, हा काही खराखुरा प्रसंग नव्हे, तर पोलिसांनी केलेल्या रंगीत तालमीचा भाग होता.
गुरुवारी या प्रकारामुळे मात्र हिंगोलीतील नागरिक भयभीत झाले होते. शिवाय बसस्थानकात काही वेळातच सन्नाटा पसरला. प्रवासी, नागरिक व्यापारी आॅटवाले सैरावैरा पळू लागले. जागो-जागी अतिरेकी घुसल्याची एकच चर्चा ऐकायला मिळत होती. काही वेळाने नागरिकांना ही रंगीत तालीम असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी दिली. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. येणाºया आपत्तीचा नागरिकांनी कसा सामना करावा, आतंकवाद्यांनी शहरात घुसखोरी केल्यावर पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाºयांनी नेमके काय करावे, कुठली खबरदारी घ्यावी, याबाबत सर्वांना माहिती व्हावी यासाठी हिंगोली शहरात आतंकवादी घुसल्याची रंगीत तालीम करण्यात आली. तसेच बसस्थानक परिसरात बॉम्ब एखाद्या पिशवीत असल्यास ती बॅग कशी हाताळावी, याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. अतिशय शिताफीने रंगीत तालमीतून आतंकवाद्यांना ठार करून दोघांना पकडल्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. परंतु हा सर्वांना खरोखर हल्ला झाल्याचे जाणवत होते. अनेकांनी तर जागेवरून पळ काढला. तर काहींनी थेट पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. हा सर्व प्रकार काही वेळाने आटोपता घेत नागरिकांना खरा प्रकार काय आहे, हे सांगण्यात आले. मात्र पोलिसांची मॉकड्रिल अनेकांना खराच प्रकार वाटू लागल्याने सगळेजण पळा... पळा... अतिरेकी आले असे सांगत होते.

Web Title: Run ... run away ... bus stop in the bus station!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.