मॅरेथॉनमध्ये आज धावणार जालनेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 01:21 AM2017-11-05T01:21:09+5:302017-11-05T01:21:15+5:30
येथील फनरनर फाऊंडेशनतर्फे जालन्यात प्रथमच आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेत रविवारी शेकडो जालनेकर धावणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील फनरनर फाऊंडेशनतर्फे जालन्यात प्रथमच आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेत रविवारी शेकडो जालनेकर धावणार आहेत. सकाळी साडेपाच वाजता मंठा चौफुली येथे स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा तीन गटांत होणार आहे. २१ किलोमीटरसाठी २५३ पुरुष व ३० महिलांनी, दहा किलोमीटरकरिता ३३४ पुरुष १७० महिला आणि पाच किलोमीटरसाठी ६८८ पुरुष आणि २७५ महिला सहभागी होणार आहेत. स्पर्धेला मंठा चौफुलीवरील कलश सीडसच्या मैदानावरून सुुरुवात होणार असून, सिंधीकाळेगाव येथे समारोप होणार आहे. यासाठी या मार्गावरील वाहतूक स्पर्धेच्या काळात इतरत्र वळविण्यात आली आहे.
लोकमत महामॅरेथॉन नोंदणीला प्रतिसाद
स्पर्धेत सहभागी धावपटूंना शनिवारी कलश सीड्स येथे टी शर्ट, इलेक्ट्रॉनिक चीप व अन्य साहित्याचे वाटप करण्यात आले. या ठिकाणी लोकमतच्या वतीने आयोजित केल्या जाणा-या महामॅरेथॉन स्पर्धेबाबत माहिती देण्यासाठी लावण्यात आलेल्या स्टॉलला स्पर्धकांनी मोठ्या संख्येने भेट दिली. माजी. आ. कैलास गोरंट्याल यांनी लोकमत स्टॉलला भेट देऊन उपक्रमाची माहिती घेतली.
जालना शहरासह बाहेरून आलेल्या अनेक स्पर्धकांनी या स्टॉलवर नाव नोंदणी करून लोकमत मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे निश्चित केले. लोकमत मॅरेथॉनमध्ये सभागी होण्यासाठी लोकमतच्या भोकरदन नाक्यावरील लोकमत कार्यालयात तसेच महामॅरेथॉन डॉट कॉम या संकेत स्थळावर नोंदणी करता येणार आहे.