‘ग्रामीण’मध्ये डाॅक्टर आहेत, पण कर्मचारीच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:02 AM2021-09-13T04:02:17+5:302021-09-13T04:02:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : ग्रामीण भागात कधी नव्हे इतकी डाॅक्टरांची पदे भरलेली आहेत. आजघडीला वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एकच पद ...

‘Rural’ has doctors, but not staff | ‘ग्रामीण’मध्ये डाॅक्टर आहेत, पण कर्मचारीच नाहीत

‘ग्रामीण’मध्ये डाॅक्टर आहेत, पण कर्मचारीच नाहीत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : ग्रामीण भागात कधी नव्हे इतकी डाॅक्टरांची पदे भरलेली आहेत. आजघडीला वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एकच पद रिक्त आहे. मात्र, रुग्णसेवा देणाऱ्या आरोग्य सेवकांसह विविध २९३ पदे सध्या रिक्त आहेत. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळावरच रुग्णसेवा देण्याची कसरत आरोग्य केंद्रांना करावी लागत आहे. त्यातही सध्या लसीकरणाला अधिक प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे इतर रुग्णसेवेकडे दुर्लक्ष होत असल्याची परिस्थिती आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गंत ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे ओपीडी, आयपीडी, प्रसुती, नियमित लसीकरण अशा विविध आरोग्य सेवा दिल्या जातात. या सगळ्यांसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाची डॉक्टरांपासून आरोग्य सेवकांपर्यंत २ हजार ९४५ पदे मंजूर असून, यापैकी सध्या २ हजार ६२० पदे भरलेली आहेत. ग्रामीण भागात डाॅक्टरांची वानवा असल्याची नेहमीच ओरड होते; परंतु सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची १२३पैकी १२२ पदे भरलेली आहेत. केवळ एकच पद रिक्त आहे. त्याउलट पुरुष आरोग्य सेवकांची ६६, महिला आरोग्य सेवकांची तब्बल १९० पदे रिक्त आहेत.

ऑक्टोबरअखेर रिक्त पदे भरणार

डाॅक्टरांची फारशी पदे रिक्त नाहीत. आरोग्य सेवकांची मात्र मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. ऑक्टोबरमध्ये सरळ सेवा भरतीची परीक्षा आहे. त्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत आरोग्यसेवक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदींची २६५ पदे भरण्यात येणार आहेत.

- डाॅ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी

---

ग्रामीण भागातील काही रिक्त पदांची स्थिती

पदाचे नाव----भरलेली पदे---रिक्त जागा

वैद्यकीय अधिकारी--१२२-- १

आरोग्यसेवक पुरुष --१९४-- ६६

आरोग्य सहाय्यक पुरुष-- ६९-- ७

आरोग्यसेवक महिला --२८६-- १९०

आरोग्य सहाय्यक महिला --३७-- १३

औषध निर्माण अधिकारी --५३ -- ७

-------

Web Title: ‘Rural’ has doctors, but not staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.