दिवाळीनिमित्त घरी जाण्याची लगबग; बसेस, रेल्वे हाऊसफुल, जागेसाठी प्रवाशांची कसरत

By योगेश पायघन | Published: October 22, 2022 07:03 PM2022-10-22T19:03:42+5:302022-10-22T19:04:01+5:30

शहरात शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी असलेल्या विविध जिल्ह्यांमधील विद्यार्थी, नोकरदार, कर्मचारी दिवाळी सणानिमीत्त गावी निघायला सुरूवात झाली.

Rushing home for Diwali, buses, trains houseful; Passengers jostle for space | दिवाळीनिमित्त घरी जाण्याची लगबग; बसेस, रेल्वे हाऊसफुल, जागेसाठी प्रवाशांची कसरत

दिवाळीनिमित्त घरी जाण्याची लगबग; बसेस, रेल्वे हाऊसफुल, जागेसाठी प्रवाशांची कसरत

googlenewsNext

औरंगाबाद : दिवाळीनिमीत्त गावी जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकासह रेल्वेस्थानक प्रवाशांच्या गर्दींनी फुलले आहे. रेल्वे प्लॅटफार्मवर तर बसेस फलाटावर येत नाही तोच अवघ्या काही वेळेत भरून जात आहे. त्यातही जागा मिळवण्यासाठी प्रवाशी मध्यवर्ती व सिडको बसस्थानकात विविध क्लुप्त्या लढवतांना शुक्रवारी दिसून आले. लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी जागा मिळवण्याकरता प्रवाशांना कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिवसभर होते.

शहरात शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी असलेल्या विविध जिल्ह्यांमधील विद्यार्थी, नोकरदार, कर्मचारी दिवाळी सणानिमीत्त गावी निघायला सुरूवात झाली. शुक्रवारी, शनिवारी ही संख्या लक्षणीय वाढल्याने गावी परतणाऱ्या प्रवाशांची रेल्वेस्टेशन आणि बसस्थानकात गर्दी होत आहे. गर्दी लक्षात घेऊन एस.टी. महामंडळातर्फे जादा बसेस सोडण्यात येत आहे. मात्र, काही मार्गावरील बसेस वेळवर येत नसल्यामुळे प्रवाशांना बऱ्याच वेळ ताटकळावे लागले. परभणी, नांदेड, मुंबई,नाशिक, हैदराबाद आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेला प्राधान्य दिले जात असून परंतु बहुतांश रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल आहे. त्यामुळे साध्या तिकीटावर प्रवास करतांना जागा मिळविण्यासाठी प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

बसमध्ये जागेसाठी खिडकीतून घूसण्याचे प्रयत्न
मध्यवर्ती बसस्थानकात बस फटाटावर येत नाही. तोच प्रवाशी बस भोवती गराडा घालत होते. तर अनेक जण जागा मिळवण्यासाठी कुणी खिडकीतून रूमाल आसनावर फेकत होते. तर कुणी थेट खिडकीतून बसमध्ये घुसत होते. जागेसाठी जीवघेणी कसरत करतांना प्रवाशी शुक्रवारी दिसून आले.

 

Web Title: Rushing home for Diwali, buses, trains houseful; Passengers jostle for space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.