आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत रियान इंटरनॅशनल ठरले ‘चॅम्पीयन’
By Admin | Published: February 22, 2016 12:20 AM2016-02-22T00:20:25+5:302016-02-22T00:20:25+5:30
जालना : लोकमत टाईम्स कॅम्पस क्लब आयोजित आणि अनिल जिंदल वर्ल्ड स्कूल व समर्थ स्पोर्टस अॅण्ड म्युझिकल प्रायोजित आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद रियान इंटरनॅशनल स्कूलने पटकावले
जालना : लोकमत टाईम्स कॅम्पस क्लब आयोजित आणि अनिल जिंदल वर्ल्ड स्कूल व समर्थ स्पोर्टस अॅण्ड म्युझिकल प्रायोजित आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद रियान इंटरनॅशनल स्कूलने पटकावले. याशिवाय गोल्डन ज्युबिली संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले तर अनिल जिंदल वर्ल्ड स्कूलने स्पर्धेत तिसरे स्थान पटकावून यजमान पदाची शान राखली.
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात मुलींचा प्रदर्शनीय क्रिकेटचा सामना खेळविण्यात आला. एमआरडीए आणि एम.एस.जैन विद्यालया दरम्यान झालेल्या या सामन्यात एमआरडीएच्या मुलींच्या संघाने बाजी मारली. सहा षटकांत एमआरडी ने ५१ धावा तडकावल्या. प्रत्युत्तरात एम. एस. जैनचा संघ ३७ धावातच गारद झाला. त्यानंतर दामिनी पथकाच्या प्रमुख सीमा घुगे यांनी अंतिम सामन्यासाठी नाणेफेक केला. गोल्डन ज्युबिली आणि रियान इंटरनॅशनलच्या संघामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात गोल्डन ज्युबिलीने प्रथम फलंदाजी करताना १० षटकात ६६ धावा केल्या. प्रत्युत्तरात रियान इंटरनॅशनलने हे लक्ष सहज पार करत चॅम्पियनशीपवर आपले नाव कोरले. या सामन्यात नितीन शेळकेने मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करून संघाला विजय मिळवून दिला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दामिनी पथकाच्या सीमा घुगे, गोल्डन ज्युबिलीचे प्राचार्य श्री.पी. सुरेश व जिंदल ग्रुपचे निखील जिंदल उपस्थित होते.कार्यक्रमाला लोकमत जालनाचे शाखा व्यवस्थापक मोहित पवार उपस्थित होते. चार दिवस चाललेल्या या स्पर्धेसाठी ग्राउंड मेंटेंनसचे काम नीलेश पैठणे यांनी पाहिले. तर सचिन गिरी यांनी कार्यवाहकाची भूमिका पार पाडली. अनिल जिंदल वर्ल्ड स्कूलचे प्राचार्य प्रवीण झीर यांनी ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य केले. पंच म्हणून सीमा पवार, प्रियंका दायमा, सुप्रिया सोनवणे, रूषी गरड आणि पवन ठाकूर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रायोजक समर्थ म्युझिकल स्पोर्टस अॅण्ड फिटनेस आणि अनिल जिंदल वर्ल्ड स्कूल होते.