रायन, एस.बी.ओ.ए., स्वामी विवेकानंद अकॅडमी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:55 AM2017-11-21T00:55:55+5:302017-11-21T00:56:52+5:30

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ स्टेडियमवर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत रायन इंटरनॅशनल, एस.बी.ओ.ए. आणि स्वामी विवेकानंद अकॅडमी या संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. प्रतीक काप्दे, श्रीनिवास कुलकर्णी व ओमकार शिंदे हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.

Ryan, SBOA, Swami Vivekananda Academy won | रायन, एस.बी.ओ.ए., स्वामी विवेकानंद अकॅडमी विजयी

रायन, एस.बी.ओ.ए., स्वामी विवेकानंद अकॅडमी विजयी

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ स्टेडियमवर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत रायन इंटरनॅशनल, एस.बी.ओ.ए. आणि स्वामी विवेकानंद अकॅडमी या संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. प्रतीक काप्दे, श्रीनिवास कुलकर्णी व ओमकार शिंदे हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.
पहिल्या सामन्यात पी.एस.बी.ए.विरुद्ध रायन इंटरनॅशनलने १५ षटकांत ६ बाद १०२ धावा केल्या. त्यांच्याकडून प्रतीक काप्दे याने ४४ चेंडूंत ५२ धावा केल्या. पी.एस.बी.ए.कडून सिद्धांत परदेशी याने ४ गडी बाद केले. इशान संघवीने २ बळी घेतले. प्रत्युत्तरात पी.एस.बी.ए. अ संघ ७ बाद १०० धावा करू शकला. त्यांच्याकडून कुणाल लेले याने ३ चौकारांसह ३१, इशान संघवी याने १९ व विनय पांचालने १५ धावा केल्या. रायन इंटरनॅशनलकडून आकाश खैरनारने ३ गडी बाद केले.
दुसºया सामन्यात पोद्दार इंटरनॅशनलविरुद्ध एस.बी.ओ. संघाने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकांत ५ बाद १४९ धावा केल्या. त्यांच्याकडून श्रीनिवास कुलकर्णीने ५९, सर्वज्ञ शेपाल याने २५ व श्रेयस पाटीलने १८ धावा केल्या. पोद्दार इंटरनॅशनलकडून प्रणव शिवणकरने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात पोद्दार इंटरनॅशनलने १५ षटकांत ९ बाद १०३ धावा केल्या. एस.बी.ओ.ए.कडून ऋषिकेश मुंढेने ९ धावांत ३ व श्रेयस पाटीलने २ गडी बाद केले.
तिसºया सामन्यात स्वामी विवेकानंद अकॅडमीने रेजिमेंटल स्कूलला ८.२ षटकांत ३० धावांत गुंडाळले. त्यांच्याकडून देवश्री भावसारने ३, तर यश गाजरे, ओमकार शिंदे व रोहित बनसोडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात स्वामी विवेकानंद अकॅडमीने विजयी लक्ष्य ६.१ षटकांत ३ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून ओमकार शिंदेने १४ धावा केल्या. रेजिमेंटलकडून वैभव बनसोडे याने २ व गणेश हांगे याने १ गडी बाद केला.

Web Title: Ryan, SBOA, Swami Vivekananda Academy won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.