बोरगाव अर्जमध्ये भगवा, जळगाव मेटे, पिंपरी भाजपकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:06 AM2021-01-19T04:06:53+5:302021-01-19T04:06:53+5:30
बोरगाव अर्ज ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे पाटील ...
बोरगाव अर्ज ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे पाटील यांच्या गणपती ग्रामविकास पॅनलने नऊपैकी सात जागा जिंकून भगवा फडकविला, तर पिंपरी सताळा येथील ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत भाजप पुरस्कृत पंढरीनाथ देवरे यांच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज ग्राम विकास पॅनलने सहा जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले, तर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या जळगाव मेटे येथील ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत फुलंब्री पंचायत समितीचे माजी सभापती सर्जेराव पाटील मेटे व उद्योगपती अंबादास पाटील यांच्यात चुरशीची लढत होती. या लढतीत माजी सभापती सर्जेराव पाटील मेटे यांच्या सुनबाई विरुद्ध उद्योगपती अंबादास मेटे यांचे चिरंजीव उभे होते. त्यामुळे या लढतीला अधिक महत्त्व आले होते.
या अत्यंत झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत माजी सभापती सर्जेराव पाटील यांनी सातपैकी पाच जागा जिंकून ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा कायम ठेवला.
फोटो : जळगाव मेटे येथील भाजपाचे विजयी उमेदवार जल्लोष करताना.