सॅफरॉन लँडमार्क बनले महामॅरेथॉनचे टायटल स्पॉन्सर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:46 AM2017-09-29T00:46:59+5:302017-09-29T00:46:59+5:30

शहराला वेध लागलेल्या लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेचा ज्वर हळूहळू चढत आहे.

Saffron landmark became title sponsors of mahamarathon | सॅफरॉन लँडमार्क बनले महामॅरेथॉनचे टायटल स्पॉन्सर्स

सॅफरॉन लँडमार्क बनले महामॅरेथॉनचे टायटल स्पॉन्सर्स

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद :शहराला वेध लागलेल्या लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेचा ज्वर हळूहळू चढत आहे. सॅफरॉन लँडमार्क आणि सॅफरॉन लँडस्केप यांनी ‘लोकमत महामॅरेथॉन-२०१७’ स्पर्धेच्या टायटल स्पॉन्सरची जबाबदारी स्वीकारली आहे. ही स्पर्धा १७ डिसेंबरला औरंगाबादेत होत
आहे.
आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करून शहराची नवी ओळख निर्माण करण्याच्या हेतूने गेल्या वर्षी ‘लोकमत’ने २१ कि. मी. मॅरेथॉनचे आयोजन केले होते. शहरामध्ये प्रथमच भव्य स्पर्धा होत असल्यामुळे हजारो लोकांनी सहभाग नोंदवून मॅरेथॉन यशस्वी केली. यंदा त्यापेक्षाही मोठी स्पर्धा घेण्यात येणार आहे. या मॅरेथॉनमध्ये ‘मजा भी दुगना होगा’!
सॅफरॉन असोसिएटस्चे दोन प्रकल्प - सॅफरॉन लँडमार्क आणि सॅफरॉन लँडस्केप यांचा शुभारंभ नुकताच झाला. ‘लँडमार्क’ हे कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे तर ‘लँडस्केप’ हा निवासी २५ बंगल्यांचा प्रकल्प आहे. महारेरा कायद्यांतर्गत नोंदणीकृत एमआयटी कॉलेजजवळ उभारल्या जाणाºया प्रकल्पात सर्व सुख-सुविधा आहेत. ज्याप्रमाणे सॅफरॉन आधुनिक जीवनशैलीनुसार आधुनिक प्रकल्प विकसित करीत आहे, त्याप्रमाणे लोकमत महामॅरेथॉनसुद्धा शहराचे जीवनमान उंचावत आहे. दोघांचे एकत्र येणे जणू नैसर्गिक भागीदारीच. सॅफरॉन गु्रपचे संचालक अनिल मुनोत, मनोज काला, महेश लाभशेटवार, राजेश वरगंटवार, ललित झांबड, मनीष पारेख यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आगळीवेगळी भेट ठरणार आहे. तुम्ही जर अद्याप तयारी सुरू केली नसेल तर कसली वाट पाहताय? ‘जागो रे, भागो रे’चा नारा देत करा सराव. कारण ही महामॅरेथॉन केवळ स्पर्धा नाही. स्वत:ला ओळखण्याची ती एक धाव आहे.

Web Title: Saffron landmark became title sponsors of mahamarathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.