सागरमोती काव्यसंग्रहाचे प्रकाशन
By Admin | Published: May 20, 2014 01:41 AM2014-05-20T01:41:36+5:302014-05-20T01:45:17+5:30
नांदेड: प्रतिभा ही निसर्गदत्त असली तरी परिश्रमाचे खतपाणी घालून कलाकृतीला पैलू पाडावे लागतात तेव्हास सकस निर्मिती होते, असे प्रतिपादन साहित्यिक देविदास फुलारी यांनी केले़
नांदेड: प्रतिभा ही निसर्गदत्त असली तरी परिश्रमाचे खतपाणी घालून कलाकृतीला पैलू पाडावे लागतात तेव्हास सकस निर्मिती होते, असे प्रतिपादन साहित्यिक देविदास फुलारी यांनी केले़ अंजू विश्वंभर यांच्या सागरमोती या काव्यसंग्रहाचे प्रकाशन हॉटेल ताज पाटील येथे नुकतेच करण्यात आले़ यावेळी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी प्राचार्य ग़ पि़ मनूरकर होते़ तर प्रमुख अतिथी म्हणून राजश्री पाटील, कवी व्यंकटेश चौधरी यांची उपस्थिती होती़ फुलारी म्हणाले, वाचन, चिंतनाच्या माध्यमातून निरंतर साधना आणि उपजत प्रतिभेच्या माध्यमातून मिळालेले संचित ही उत्कृष्ट काव्यनिर्मितीची परिमाणे होत़ अंजू विश्वंभर यांच्या कवितेत नवखेपणा जाणवत असला तरी परिश्रमाने अभिव्यक्ती समृद्ध करण्याची त्यांची तयारी त्यांना यशाची वाट दाखवेल़ मनूरकर म्हणाले, अलीकडे स्त्रिया मोठ्या प्रमाणावर लेखन करीत आहेत़ त्यामुळे वाचन संस्कृती वाढू लागलेली आहे़ सूत्रसंचालन डॉ़ सुजाता जोशी पाटोदेकर यांनी तर जयप्रकाश सूरनर यांनी आभार मानले़ कार्यक्रमास कांताबाई शिंदे, प्रभाकर कानडखेडकर, डॉ़ वृषाली किन्हाळकर, अरूणा संगेवार, डॉ़ भगवान अंजनीकर, प्रा़ महेश मोरे, निर्मलकुमार सूर्यवंशी, बापू दासरी, पंडित पाटील, रमेश यन्नावार उपस्थित होते़ (प्रतिनिधी)