सहारा मुंबई संघ अंतिम फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 01:11 AM2018-02-01T01:11:00+5:302018-02-01T01:11:15+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गरवारे क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत सहारा ‘मुंबई’ आणि ‘ग्लास पॉलिश इंडिया’ या दोन संघांत विजेतेपदाची लढत होणार आहे. बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत ग्लास पॉलिश इंडिया संघाने शहर पोलीसचा, तर दुसºया उपांत्य फेरीत सहारा मुंबईने पुणे संघाचा पराभव केला.
औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गरवारे क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत सहारा ‘मुंबई’ आणि ‘ग्लास पॉलिश इंडिया’ या दोन संघांत विजेतेपदाची लढत होणार आहे. बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत ग्लास पॉलिश इंडिया संघाने शहर पोलीसचा, तर दुसºया उपांत्य फेरीत सहारा मुंबईने पुणे संघाचा पराभव केला.
पहिल्या उपांत्य फेरीत ग्लास पॉलिश इंडियाने २0 षटकांत ७ बाद १९0 धावा केल्या. त्यांच्याकडून रोहित राणे याने ४९ व खालीद झमान याने ४१ धावा केल्या. शहर पोलीसकडून इम्रान खानने २ गडी बाद केले. संदीप सहानी, अमित पाठक व अंकित अंबेपवार यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात शहर पोलीस संघ १९.४ षटकांत १२९ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून मुकीम शेखने ३२ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ५५ व राहुल शर्माने २९ धावा केल्या. कुमार दोरेसा, तुषार म्हात्रे, सागर मुळे यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.
दुसºया उपांत्य फेरीत प्रीतम पाटीलने ५३ चेंडूंत ५ चौकार व १0 षटकारांसह ठोकलेल्या १00 धावांच्या बळावर सहारा मुंबईने २ बाद २१७ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात साई ९ स्पोर्टस् पुणे संघ १३४ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून सूरज शिंदेने ५७ धावा केल्या. मानसिंग निगडेने ३ गडी बाद केले.