महिलांच्या उदंड प्रतिसादात सखी महोत्सव
By Admin | Published: August 5, 2014 11:51 PM2014-08-05T23:51:17+5:302014-08-05T23:59:59+5:30
वसमत : महिलांच्या आवडी जपत जिव्हाळ्याच्या विषयावर घेतलेल्या ‘सखी महोत्सवा’ तील स्पर्धेला उंदड प्रतिसाद मिळाला.
वसमत : महिलांच्या आवडी जपत जिव्हाळ्याच्या विषयावर घेतलेल्या ‘सखी महोत्सवा’ तील स्पर्धेला उंदड प्रतिसाद मिळाला. बहुतांश महिलांनी सक्रिय सहभाग घेतल्यामुळे प्रत्येक स्पर्धा रंगतदार झाली. स्पर्धेतील विजयासाठी कौशल्य पणाला लावत महिलांनी पारितोषिके पटकावली.
‘लोकमत’ सखी मंचच्या वतीने श्रावण मासानिमित्त ३ आॅगस्ट रोजी वसमत येथील सह्याद्री पब्लिक स्कुलमध्ये ‘सखी महोत्सव’ घेण्यात आला. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी जी. एन. कदम, सुवर्णा कदम, संजय स्वामी, रियाज कुरेशी, गायत्री स्वामी, आशिष पवार, एस.एन. प्रसाद, मीनाक्षी नल्लेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. खासकरून पसंतीच्या विषयामुळे ब्रायडल मेकअप स्पर्धेत अपेक्षेपेक्षा अधिक महिलांनी भाग घेतला. या स्पर्धेत सुनंदा जैन, वृंदा चव्हाण, आशा पैंजने, उज्ज्वला लंकडवार, सारिका डिगुळकर यांनी बाजी मारली. विविध प्रकारच्या कलाकुसरीचा नमुना मेहंदी स्पर्धेमुळे सखींना पहावयास मिळाला. त्यात मयुरी भागानगरे, स्नेहल माटे, अर्चना रामनगिरे यांनी विजय मिळवला. नित्याच्या कामाचा भाग असल्यामुळे पाककृती स्पर्धेत महिलांची संख्या लक्षणीय होती. भारतीय आणि वेस्टर्न पद्धतीचे रूचकर व चवदार पदार्थ तयार करण्याच्या रेसिपीचे ज्ञान महिलांना मिळाले. या स्पर्धेत तृप्ती अक्करबोटे, प्रज्ञा संघई, कावेरी भागवत, उज्वला लंकडवार, रूपाली दलाल यांनी पारितोषिक पटकाविले.
फॅन्सी ड्रेस स्पर्धेने या महोत्सवाची शोभा वाढविली. पारंपरिक आणि नव्या पद्धतीच्या वेशभूषा लक्षवेधी ठरल्या. आकर्षक वेशभूषेने रूपाली दलाल, प्रज्ञा संघई, जयश्री पाटील, सुवर्णा देशमुख, कावेरी सातपुते या पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या. विविध स्पर्धांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मीनाक्षी पवार, ए.एस. प्रसाद, मीनाक्षी नल्लेवार, वैशाली काबरा आदींनी काम पाहिले.
महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी उज्वला तोळमारे, अनिता कुलकर्णी, शेखर जैस्वाल यांनी परिश्रम घेतले. प्रायोजकत्व सह्याद्री पब्लिक स्कुल, गायत्री होम अप्लायन्सेस, वैभव ड्रेसेस, सम्राट कलेकशन यांनी स्विकारले होते. (वाणिज्य प्रतिनिधी)