हुरडा पार्टीमध्ये सखींची धमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:02 AM2021-02-08T04:02:01+5:302021-02-08T04:02:01+5:30
थंडीची चाहूल लागली की, आपसूकच गरमागरम हुरडा खाण्याची ओढ लागते. यंदा कोरोनामुळे जरा उशीर झाला होता, तरीही आपल्या सखींना ...
थंडीची चाहूल लागली की, आपसूकच गरमागरम हुरडा खाण्याची ओढ लागते. यंदा कोरोनामुळे जरा उशीर झाला होता, तरीही आपल्या सखींना हुरड्याचा आनंद मात्र घेता यावा, यासाठी सखी मंचच्या वतीने हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. दि. ६ फेब्रुवारी रोजी नक्षत्रवाडी-वळदगाव शिवारातील पल्लवांकुर ॲग्रो टुरिझम येथे सखींच्या प्रचंड उत्साहात हुरडा पार्टी पार पडली.
सकाळी ८ वाजेपासूनच सखींनी पल्लवांकुर येथे जमण्यास सुरुवात केली होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच एकमेकींना भेटल्याचा आनंद प्रत्येक सखीच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. गरमागरम हुरड्यासोबत रानमेवा, भरीत, भाकरी, ठेचा असे अस्सल गावरान पदार्थ, फळे अशी खाद्यपदार्थांची रेलचेल तर होतीच, शिवाय वन मिनीट गेम, रेन डान्स, ट्रॅक्टर सफारी, उंच झोका ही सगळी बालपणीची मजाही सखींना अनुभवता आली.
शिवाय विविध खेळ आणि स्पर्धांच्या माध्यमातून सखींनी विविध बक्षिसेही पटकाविली. सुकृत वैद्य यांच्या हस्ते वन मिनीट गेम शोमध्ये विजयी ठरलेल्या सखींना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
चौकट :
सखींनी लुटला आनंद
लोकमत सखी मंचच्या सदस्या येणार असल्यामुळे आम्हीही पल्लवांकुर ॲग्रो टुरिझम येथे विशेष तयारी केली होती. पल्लवांकुर नर्सरी येथे तयार केलेली प्रत्येक गोष्ट सखी कुतूहलाने न्याहाळत होत्या आणि येथील विविध गोष्टींचा आनंद घेत धमाल करत होत्या.
- सुहास वैद्य
संचालक, पल्लवांकुर नर्सरी
सूचना-
१. सखीमंचचा लोगो घेणे.
२. सुहास वैद्य यांचा सिंगल कॉलम फोटो आहे.
३. पल्लवांकुर नर्सरी येथे हुरडा पार्टीमध्ये धमाल करताना सखी मंचच्या सदस्या.