विद्यापीठाने रोखले कक्ष अधिकाऱ्याचे वेतन

By | Published: December 2, 2020 04:09 AM2020-12-02T04:09:03+5:302020-12-02T04:09:03+5:30

औरंगाबाद : बदली झाल्यानंतर कार्यमुक्त न होता पहिल्या जागेवर ठाण मांडलेल्या परीक्षा विभागातील कक्ष अधिकाऱ्याविरुद्ध वेतन रोखण्याची कारवाई विद्यापीठ ...

The salary of the cell officer withheld by the university | विद्यापीठाने रोखले कक्ष अधिकाऱ्याचे वेतन

विद्यापीठाने रोखले कक्ष अधिकाऱ्याचे वेतन

googlenewsNext

औरंगाबाद : बदली झाल्यानंतर कार्यमुक्त न होता पहिल्या जागेवर ठाण मांडलेल्या परीक्षा विभागातील कक्ष अधिकाऱ्याविरुद्ध वेतन रोखण्याची कारवाई विद्यापीठ प्रशासनाने केली आहे.

वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला. साधारणपणे मे महिन्यात बदल्या केल्या जातात; परंतु यंदा कोरोना संसर्गामुळे बदल्यांना विलंब झाला. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे काही कर्मचाऱ्यांच्या हेकेखोरपणाबद्दल तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर कुलगुरूंनी कोणत्या विभागात कोणता कर्मचारी व तो कधीपासून काम करतो, याबाबतची माहिती जाणून घेतली. तेव्हा त्यांच्या निदर्शनास काही घटना समोर आल्या. कुलगुरूंच्या आदेशानुसार कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी १९ ऑक्टोबर रोजी २१ स्थायी व १० रोजंदारीवरील कर्मचारी, अशा एकूण ३१ कर्मचाऱ्यांचे वेगवेगळ्या विभागांत बदली आदेश निर्गमित केले.

दरम्यान, ३० ऑक्टोबरपूर्वी जवळपास बदली झालेले सर्वच कर्मचारी व अधिकारी कार्यमुक्त झाले व बदलीच्या विभागात रूजूही झाले. परीक्षा विभागातील कक्ष अधिकारी पोपट निकम हे मात्र कार्यमुक्त झाले नाहीत. ते आहेत त्याच ठिकाणी सेवा बजावत होते. यासंदर्भात कुलसचिव डॉ. सूर्यवंशी यांनी निकम यांना कार्यमुक्त होण्याबाबत सुरूवातीला तोंडी सूचना दिल्या. तरीही ते कार्यमुक्त झाले नाहीत. त्यानंतर त्यांना कारणे दर्शक नोटीस बजावली. नोटीसला उत्तर द्यायच्याऐवजी निकम यांनी त्या नोटिसीच्या पाठीमागे लिहून आपली बदली करण्याचे कारण काय, असा प्रशासनाला प्रश्न विचारला. तेव्हा प्रशासनाने त्यांंना एकतर्फी कार्यमुक्त (स्टँडींग रिलीव्ह) केले व त्यांचे नोव्हेंबर महिन्याचे वेतन रोखण्याचे आदेश आस्थापना विभागाला दिले.

चौकट....

सहा कक्ष अधिकाऱ्यांच्या झाल्या होत्या बदल्या

कक्ष अधिकारी पोपट निकम यांच्यासह सहा कक्ष अधिकाऱ्यांच्या विविध विभागांत बदल्या करण्यात आल्या. यामध्ये निकम यांची परीक्षा विभागातून राष्ट्रीय सेवा विभागात, कक्ष अधिकारी बी. एन. फड यांची परीक्षा विभागातून कुलसचिव कार्यालय, कक्ष अधिकारी ए.ए.वडोदकर यांची प्र- कुलगुरू कार्यालयातून सांख्यिकी विभागात, कक्ष अधिकारी जी. जी. खरात यांची आस्थापना विभागातून लेखा विभागात, कक्ष अधिकारी वाय. एस. शिंदे यांची लेखा विभागातून आस्थापना विभागात, कक्ष अधिकारी डॉ. ए.यू. पाटील यांची सांख्यिकी विभागातून पीएच.डी. विभागात बदली करण्यात आली.

Web Title: The salary of the cell officer withheld by the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.