'ड्राय डे' दिवशी पार्टी; तीन धाबा मालकांसह ३८ मद्यपींना न्यायालयाचा १ लाख १८ हजारांचा दंड

By राम शिनगारे | Published: November 16, 2022 06:42 PM2022-11-16T18:42:45+5:302022-11-16T18:43:03+5:30

पाच ढाब्यांवर छापा : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Sale of liquor on 'Dry Day'; Court fined 1 lakh 18 thousand to 38 drunkards including 3 dhaba owners | 'ड्राय डे' दिवशी पार्टी; तीन धाबा मालकांसह ३८ मद्यपींना न्यायालयाचा १ लाख १८ हजारांचा दंड

'ड्राय डे' दिवशी पार्टी; तीन धाबा मालकांसह ३८ मद्यपींना न्यायालयाचा १ लाख १८ हजारांचा दंड

googlenewsNext

औरंगाबाद : कार्तिकी एकदशीच्या दिवशी 'ड्राय डे' असताना अवैधपणे दारू विकणारे व दारू पिण्यास मद्यपींना जागा उपलब्ध करून देणाऱ्या चार ढाब्यांवर राज्य उत्पादन शुल्कच्या 'ब' विभागासह भरारी पथकाने छापा मारीत दोन ढाबा मालकांसह २९ मद्यपींना पकडले होते. या आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करून सत्र न्यायालयात हजर केले असता, ९० हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. तर 'क' विभागाच्या एका कारवाईत एक ढाबामालकासह सहा मद्यापींना खुलताबाद न्यायालयाने २८ हजार रुपये दंड केल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.

४ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीच्या दिवशी समर्थनगर भागातील हॉटेल खालसा पंजाबी हॉटेल येथे छापा मारल्यानंतर मालक संतोषसिंग बलविंदरसिंग सिद्धू (रा. बाबा पेट्रोल पंप, म्हाडा कॉलनी) यांच्यासह मद्यसेवन करणारे करणसिंग सुनील अग्रवाल, महेश भाऊसाहेब खवले, वसीमखान चाँदखान, सिद्धार्थ निवृत्ती भालेराव, अजय रविंद्र सावळे, स्वप्नील सदानंद गांगुर्डे, मनोहर श्यामराव वागतकर, राहुल शामराव खोसरे, जगदिश ताराचंद गुडीवाल, गाेविंदसिंग सैतानसिंग राठोड, नरेंद्र भागवतराव कोळपकर यांना पकडले. या सर्वांच्या विरोधात गुन्हा नोंदवून सत्र न्यायालयात हजर केले असता, हॉटेल मालकास २५ हजार व १२ मद्यापींना प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला. दुसरी कारवाई जालना रोडवरील सुंदरवाडी येथील ब्लु बर्ड याठिकाणी करण्यात आली. त्याठिकाणी हॉटेल चालक धनश्याम दिगांबर मोरे (रा. रामनगर) यांच्यासह मद्यसेवन करणारे सुनील माणिकचंद पेंढरकर, विजय सुरेश सोनवणे, विजय एकनाथराव गवळी, गणेश जगन्नाथ घोडे, बाळासाहेब मच्छिंद्र राऊत, तुषार पद्ममाकर कुळकर्णी यांना पकडले. यात मालकास २५ हजार रुपये आणि सहा मद्यपींना प्रत्येकी २ हजार ५०० रुपये दंड करण्यात आला. 

तिसऱ्या कारवाईत जालना रोडवरील साईश्रद्धा हॉटेलवर छापा मारीत मद्यसेवन करणारे काशीनाथ शिवाजी काळे, महेश हनुमंतराव भोळे, नंदकिशोर पंढरी देवळकर, अभिषेक मोहन दांडगे, अजयकुमार एकनाथ काटे, आकाश नामदेव बोर्डे व निखील नागेश जोशी यांना पकडले. या सात जणांना न्यायालयाने प्रत्येकी २ हजार ५०० रुपये दंड ठोठावला. चौथ्या कारवाई वाळूज एमआयडीसी भागातील हॉटेल टेस्ट ॲण्ड बेस्ट याठिकाणी करण्यात आली. या छाप्यात मद्यपी महम्मद सय्यद फारूख सय्यद, राजु सरदार पटेल, अप्पासाहेब मुरलीधर पठाडे, आत्माराम उत्तम मोटे यांना पकडले. या चौघांना न्यायालयाने प्रत्येकी ५०० रुपये दंड केल्याचे निरीक्षक राहुल गुरव यांनी सांगितले. 

ही कारवाई अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक प्रदीप पोटे, निरीक्षक राहुल गुरव, दुय्यम निरीक्षक एस.बी. रोटे, ए.ई. तातळे, जी.बी. इंगळे, बी.आर.वाघमोडे. सहाय्यम दुय्यम निरीक्षक आनंद शेंदरकर, जवान युवराज गुंजाळ, रविंद्र मुरडकर, शारेक कादरी, योगेश कल्याणकर, ठाणसिंग जारवाल, गणपत शिंदे, सचिन पवार आणि किशोर सुंदर्डे यांच्या पथकाने केली.

बाजारसावंगीत हॉटेलवर छापा
राज्य उत्नादन शुल्क क विभागाने बाजारसावंगी येथील हॉटेल सपना याठिकाणी १० नोव्हेंबर रोजी छापा मारला. या छाप्यात हॉटेल मालकासह ६ सहा मद्यापींना पडकण्यात आले. या सर्व आरोपींवर गुन्हे नोंदवीत खुलताबाद प्रथमवर्ग न्यायालयासमोर हजर केले असता, मालकास २५ हजार आणि मद्यपींना प्रत्येकी ५०० रुपये असा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती निरीक्षक एन.एस. डहाके यांनी दिली.

 

Web Title: Sale of liquor on 'Dry Day'; Court fined 1 lakh 18 thousand to 38 drunkards including 3 dhaba owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.