आॅरिकमधील दुसºया टप्प्यातील प्लॉटची विक्री सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:56 AM2017-08-28T00:56:56+5:302017-08-28T00:56:56+5:30
आॅरिक सिटी (औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी) मधील शेंद्रा एमआयडीसीतील दुसºया टप्प्यातील २२ प्लॉट विक्रीची आॅनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आॅरिक सिटी (औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी) मधील शेंद्रा एमआयडीसीतील दुसºया टप्प्यातील २२ प्लॉट विक्रीची आॅनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील २४ प्लॉट उद्योगांना देण्यात आले असून, त्यावर लवकरच उद्योग सुरू होणे अपेक्षित आहे.
८ सप्टेंबर २०१७ पर्यंत उद्योग इच्छुकांना प्लॉट घेण्याच्या हेतूने अर्ज करता येतील. दुसºया टप्प्यात दोन प्लॉट व्यावसायिक असून, २० प्लॉट उद्योगांसाठी आहेत, अशी माहिती आॅरिकचे महाव्यवस्थापक गजानन पाटील यांनी दिली. त्यांनी सांगितले की, प्लॉट घेण्याची इच्छा असणाºयांनी आॅरिकच्या वेबसाईटवर अर्ज करावेत. शेंद्रा सेक्टर-१ मधील प्लॉट नंबर १९ आणि २० हे व्यावसायिक आहेत. सेक्टर-५ मधील प्लॉट नंबर एक, तीन, चार, पाच, सात, दहा, चौदा, एकोणीस, तेवीस-ब, चोवीस, सव्वीस, सत्तावीस, अठ्ठावीस, एकोणतीस, चौतीस, पस्तीस- अ, सदोतीस, अडोतीस, चाळीस, त्रेचाळीस या क्रमांकांचे प्लॉट उद्योगांसाठी आहेत. ८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. अर्ज करताना आॅरिकच्या वेबसाईटमार्फतच नोंदणी करावी. औद्योगिक प्लॉट कमीत कमी ८३८ स्क्वेअर मीटर व जास्तीत जास्त ४ हजार ८०० स्क्वेअर मीटरचे आहेत. व्यावसायिक प्लॉट १ हजार स्क्वेअर मीटरपर्यंत आहेत.