सेल्स एक्झिक्युटिव्हचा मालकाला १३ लाखाचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 02:06 AM2017-11-22T02:06:27+5:302017-11-22T02:07:12+5:30
हेल्थ फर्ममध्ये सेल्स सपोर्ट एक्झिक्युटिव्ह पदावर काम करणा-या कर्मचा-याने फर्मच्या मालकालाच १३ लाख रुपयाला गंडविल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : हेल्थ फर्ममध्ये सेल्स सपोर्ट एक्झिक्युटिव्ह पदावर काम करणा-या कर्मचा-याने फर्मच्या मालकालाच १३ लाख रुपयाला गंडविल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी फर्मचे संदीप मानसिंग कोंडे-देशमुख (५१, रा. पुणे) यांच्या तक्रारीवरून अमानुल्ला मुस्तफा खान (रा. गणेश कॉलनी) याच्या विरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
८ महिन्यांत या कर्मचाºयाने १३ लाख ९८ हजार ७९२ रुपयांचा रोख, तसेच फर्मच्या साहित्याची अफरातफर करून मालकाची फसवणूक केली. अमानुल्ला हा फर्ममध्ये काही महिन्यांपासून सेल्स विभागात कार्यरत होता. त्याने फेब्रुवारी महिन्यापासून हेल्थ केअर अॅण्ड हायटेक प्रॉडक्टस्कडे १० लाख ४८ हजार २५० रुपयांचे साहित्य विक्रीची रक्कम जमा न करता परस्पर लांबविली.
त्यानंतर फर्मच्या नावाने महाराष्ट्र स्टेट बँकेमध्ये बोगस खाते उघडून त्याद्वारे ६५ हजार ५१८ रुपये परस्पर वळते करून घेतले. कंपनीने त्याला व्यवहारासाठी दिलेले ५५ हजार रुपयेही त्याने लांबविल्याचे कंपनी व्यवस्थापनाच्या तपासात समोर आले.
अशा प्रकारे त्याने काही महिन्यांमध्ये तब्बल १३ लाख ९८ हजार ७९२ रुपयांची फसवणूक केली. त्यानंतर देशमुख यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात याप्रकरणी त्याच्या विरोधात
तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक
धोंडे अधिक तपास करीत
आहेत.