शहीद जवान कैलास पवार यांना औरंगाबाद विमानतळावर सलामी; उद्या होणार चिखलीत अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 07:29 PM2021-08-03T19:29:22+5:302021-08-03T19:34:55+5:30

Martyr Kailash Pawar : शहीद कैलास पवार यांचे पार्थिव मंगळवारी दुपारी चिकलठाणा विमानतळावर दाखल झाले. यावेळी लष्करातर्फे त्यांच्या पार्थिवास सलामी देण्यात आली.

Salute to Martyr Kailash Pawar at Aurangabad Airport; The funeral will be held in Chikhali tomorrow | शहीद जवान कैलास पवार यांना औरंगाबाद विमानतळावर सलामी; उद्या होणार चिखलीत अंत्यसंस्कार

शहीद जवान कैलास पवार यांना औरंगाबाद विमानतळावर सलामी; उद्या होणार चिखलीत अंत्यसंस्कार

googlenewsNext
ठळक मुद्देलष्कराच्या तुकडीने त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून सलामी दिली. अत्यंत खडतर कर्तव्य बजावल्यानंतर ६ महिन्यांच्या सुटीवर येणार होते

औरंगाबाद : सियाचीन या अत्यंत खडतर ठिकाणी कर्तव्य बजावताना बर्फाळ डोंगरावरून खाली कोसळल्यामुळे लष्करातील जवान कैलास भारत पवार यांना वीरमरण आले. चिखली (जि. बुलडाणा) येथील वीरपुत्र शहीद कैलास पवार यांचे पार्थिव मंगळवारी विमानाने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. लष्कराच्या तुकडीने त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून सलामी दिली.

पवार यांची ड्युटी १ ऑगस्टला संपली होती. अत्यंत खडतर कर्तव्य बजावल्यानंतर ६ महिन्यांच्या सुटीवर ते चिखलीला येणार होते. मात्र, बर्फाळ डोंगर उतरताना दुर्घटनेत त्यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव मंगळवारी दिल्लीहून मुंबईमार्गे औरंगाबाद विमानतळावर आणण्यात आले. येथे लष्कारातर्फे त्यांना सलामी देण्यात आली. याप्रसंगी ब्रिगेडियर उपेंदरसिंग आनंद, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ, तहसीलदार ज्योती पवार, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी चौरे ‘सीआयएसएफ’चे जवान उपस्थित होते. दिवंगत जवान कैलास पवार यांच्या पश्चात आई, वडिल, मोठा भाऊ आणि धाकटी बहीण असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर ४ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

एका वषार्ची ड्यूटी १ आॅगस्टला संपली होती
चिखली येथील पुंडलिक नगर भागातील रहिवासी कैलास भारत पवार हे गेल्या २ आॅगस्ट २०२० पासून महार बटालियनमध्ये आपले कर्तव्य चोखपणे बजावत होते. हिमालय पर्वतरांगेत असलेल्या सियाचीन ग्लेशियरमधील अंग गोठवून टाकणाऱ्या थंडीत पारा शून्य अंश सेल्सिअसच्या खाली असतो. अश्या अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या ठिकाणी ते देशसेवेचे कर्तव्य बजावत होते. अश्या अत्यंत दुर्गम आणि बर्फाच्छादित प्रदेशात कैलास पवार यांची एका वषार्ची ड्यूटी १ आॅगस्टला संपली होती. 

सियाचीन येथे होते तैनात 
आपल्या सहकाऱ्यांसह कैलास सियाचीन ग्लेशियरच्या बर्फाळ डोंगरावरून खाली उतरत होते. सियाचिन ग्लेशियर पर्यंत पाठीवर सामानाचे ओझे घेऊन जाणे आणि उतरून परत येणे हा प्रवास जवानांना पायीच करावा लागतो. तेथपर्यंत पोहचायला आणि तेथून खाली यायला प्रत्येकी चार दिवस लागतात. त्यानुषंगाने त्यांचा प्रवास सुरू होता. दरम्यान, खाली उतरत असतांना बर्फाळ डोंगरावरून कैलास यांचा पाय घसरला आणि ते बर्फावरून घरंगळत जावून खाली कोसळले. त्यांच्या सोबत असलेल्या जवानांनी त्यांना तेथून हलवले आणि उपचारासाठी लडाखच्या इस्पितळात दाखल केले. परंतू, उपचारादरम्यान १ आॅगस्ट रोजी कैलास पवार यांची प्राणज्योत मालवली.

Web Title: Salute to Martyr Kailash Pawar at Aurangabad Airport; The funeral will be held in Chikhali tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.