मुक्तिसंग्राम दिनानिमित्त हुतात्म्यांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:15 AM2017-09-18T00:15:26+5:302017-09-18T00:15:26+5:30
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुख्य ध्वजवंदनाचा कार्यक्रम पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते रविवारी सकाळी नऊ वाजता टाऊन हॉल येथील हुतात्मा स्मारकाच्या प्रांगणात झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुख्य ध्वजवंदनाचा कार्यक्रम पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते रविवारी सकाळी नऊ वाजता टाऊन हॉल येथील हुतात्मा स्मारकाच्या प्रांगणात झाला. यावेळी लोणीकर यांनी हुतात्मा स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलीस जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फेरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली.
या कार्यक्रमास आ. राजेश टोपे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आमदार अरविंद चव्हाण, विलास नाईक, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अपर जिल्हाधिकारी पी. बी. खपले, उपजिल्हाधिकारी कमलाकर फड, राजेश जोशी, पाटील, सूचना व विज्ञान अधिकारी रवींद्र पडूळकर, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक व पदाधिकाºयांची उपस्थिती होती.