संभाजी सेनेचे महाअधिवेशन
By Admin | Published: April 1, 2017 12:09 AM2017-04-01T00:09:59+5:302017-04-01T00:12:41+5:30
बीड : सामाजिक क्रांतिकारी चळवळ म्हणून राज्यात उदयास आलेल्या संभाजी सेनेचे पहिले राज्यव्यापी भव्य महाअधिवेशन येथे जिल्हा क्रीडा संकुलनावर शुक्रवारी पार पडले
बीड : सामाजिक क्रांतिकारी चळवळ म्हणून राज्यात उदयास आलेल्या संभाजी सेनेचे पहिले राज्यव्यापी भव्य महाअधिवेशन येथे जिल्हा क्रीडा संकुलनावर शुक्रवारी पार पडले. मराठा आरक्षणासह शेतकरी हिताच्या निर्णयाबाबत मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
संभाजी सेनेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या लढाईसोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर माने यांनी सांगितले. राज्यव्यापी महाअधिवेशनास मुख्य मार्गदर्शक अरूण मराठे, सल्लागार प्रा. के. पी. कनके, प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, कार्याध्यक्ष रविकुमार सोडतकर, संघटक सखाराम काळे पाटील, मराठवाडा अध्यक्ष अनिल माने, कृष्णा देशमुख आदींची उपस्थिती होती. शेतकऱ्यांची कर्जमाफी, मोफत वीजपुरवठा, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियातील सदस्याला शासकीय नोकरी इ. मागण्या करण्यात आल्या. यशस्वीतेसाठी उपजिल्हाध्यक्ष श्रीराम नाईकवाडे, सुधाकर काकडे, श्रीराम शिंदे, जिल्हाध्यक्ष भरत वालेकर यांच्यासह सर्व तालुकाध्यक्षांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)