संभाजी सेनचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:33 AM2017-11-14T00:33:38+5:302017-11-14T00:33:42+5:30
जिल्ह्यात गुटखा बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी संभाजी सेनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात गुटखा बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी संभाजी सेनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
राज्य शासनाने गुटखा बंदी कायदा लागू केला आहे. परंतु, जिल्ह्यामध्ये सर्रास गुटख्याची विक्री होत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागात जागोजागी गुटखा मिळत आहे. त्यामुळे या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी संभाजी सेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, सुधाकर सोळंके, शहराध्यक्ष अरुण पवार, गजानन लव्हाळे, रवि तांबे, दौलत शिंदे, नागेश लोंढे, पिराजी देसाई, अंकुश आहेर, योगेश काकडे, मंगेश उबाळे, सोपान काळबांडे, प्रताप पवार, सिद्धेश्वर कंठाळे, अमोल पवार, तुकाराम सावंत आदींनी सहभाग नोंदविला. यावेळी अधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.